शाळेची ओढ

दिंनाक: 20 Apr 2020 22:37:49


 

ही पायाखालची वाट माझ्या शाळेची
वाटे ओढ मला शाळेमध्ये येण्याची
गुरे लावून पाण्याला
हाक मारतो गण्याला
गुणगुणत लकेर एक गाण्याची
वाटे ओढ मला शाळेमध्ये येण्याची||
नको काळजी पोटाची
नको काळजी उद्याची
मला गरज हो   मुक्त बालपणाची
वाटे ओढ मला शाळेमध्ये येण्याची||
येतो पेपर टाकून
कधी खेळणी विकून
लागे चिंता रोज उद्याच्या भविष्याची उज
वाटे ओढ मला शाळेमध्ये येण्याची||
असे अधांतरी जगणे
नाही नशिबी हसणे
कशी दैना होई पार माझ्या जिण्याची
वाटे ओढ मला शाळेमध्ये येण्याची||
नाही कोणाला भिणार
आता शाळेत जाणार
मीच ठरवली दिशा ही प्रकाशाची
वाटे ओढ मला शाळेमध्ये येण्याची||
ही पायाखालची वाट माझ्या शाळेची
वाटे ओढ मला शाळेमध्ये येण्याची||

 

-सौ.चारुता शरद प्रभुदेसाई