कोरोनाचे परिणाम

दिंनाक: 18 Apr 2020 23:28:09

 


आला आला कोरोना आला
जगाला त्याने बाधित केला

मास्क अन् सॅनिटायझरचे वाढले भाव
सगळेच म्हणतात कोरोनापासून करा बचाव

कोरोनावर ना लस ना उपाय
सर्वच लोकांनी धरले शास्त्रज्ञांचे पाय

शाळा-कॉलेज सारे रिकामे झाले
निष्पाप लोकांचे प्राण गेले

लहान मोठे सारेच झाले भयभीत
कोरोनाने केले सारे जगच विस्कळीत

कंपनी दुकानांना लागले टाळे
हे सारे नुकसान झाले कोरोनामुळे
हात धुवा अन् स्वच्छ राहा
आजारी व्यक्तींपासून दूर राहा- नेहा विठ्ठल कुंभलवाड