पाऊसधारा

दिंनाक: 15 Apr 2020 09:33:00


 

पाऊसधारा झेलताना

गाणे आनंदाचे गाताना

पंख हळूच पसरवते

मन फुलपाखरू बागडते

 

आभाळात ढग नाचती

पावसाच्या धारांभोवती

रोमांच उठे अंगावर

मन उसळते अनावर

 

हिरवे सारे रान

झुलते विसरून भान

ओला गारवा नभात

मन उभारी जोमात

 

गर्दी ढगांची नभात

काळोख पसरे क्षणात

पाऊसधारा बावरतात

मन मोकळे सावरतात

 

अनुराधा प्रल्हादराव लाहोरकर,

सह-शिक्षिका श्री सिद्धेश्वर विद्यालय

माजलगाव