संतपरंपरा श्रेष्ठ । मांदियाळी जाहली
दिंडी नित्य नवी पहा। कशी पुढे चालली!!1 ।।       
किती कोवळा ज्ञानोबा । गुणी मुक्ताई सुंदर!!
नामदेव तुकयाच्या ।  अभंगाला येई पूर!!2!!
गोरा कुंभार तल्लीन।विठुरायाच्या भक्तीत
सावत्यानी कष्ट केले।कांदामुळ्याच्या शेतीत।।३!!
चोखा कातडे ओढीता। आळवितो विठ्ठलाला।
नरहरी सोनाराला।विठु सोन्याचा दिसला।। 4!!
ओवी बहीणाबाईची। वाणी भोळ्या जनाईची
कान्होपात्रा धन्य झाली। गाता गाणी विठाइची।।5!!
रामदासांचा सुबोध। रोहिदासांचे कीर्तन
एकनाथी भागवत । त्याचे मनात चिंतन।।6!!
अशा संतांची पुण्याई। पुरे माझ्या आयुष्याला
दिव्य ज्ञानाच्या ज्योतीने !मला प्रकाश दाविला।। - ७!!

 

 

सौ चारुता प्रभुदेसाई,पुणे