पौष्टिक खाऊ

दिंनाक: 11 Apr 2020 11:20:11


कोरोना कोरोना आता बास्स
काळजी नक्कीच घेऊ पण काळजी न करता.. हाती आलेला वेळ
कसा सत्कारणी लावता येईल याचा विचार ग्रुहीणी म्हणून करू. खरच आता आपल कौशल्य वापरण्याची खरी गरज आहे.घरी आहे
त्या सामानामधे one dish meal ही संकल्पना कशी राबवता येईल आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी बाहेर जाण टाळता येईल. आपल्याकडे साठवणीचे धान्य असतेच आज मी त्या पासून तयार होणारा पदार्थ सांगते..नक्की करून पहा.पौष्टिकता, रूचकर ,कमी वेळ आणि आणि हीच खरी वेळ आहे घरातल्यांची मदत घ्यायची अहो . त्यांना तर आपल्यापेक्षा मोठा प्रश्न पडलाय काय कराव?म्हणून नक्कीच होकार देतील.
मी इथे सर्व धान्याची नावे देते आपण यापैकी जे उपलब्ध असेल ते घ्यावे
घरातील व्यक्ती नुसार..अंदाजे घ्यावे छोटी वाटी .गहू,ज्वारी, तांदुळ,सगळ्या
दाळी तुर,मुग,हरभरा,उडीद, मसुर तसेच कडधान्य मटकी,चवळी,
वाटाणा, चवळी, काबुली चणा अगदी पांढरे वाटाणे असतील तरी चालतील
मुलांना ओळख आणि फरक सांगा
कडधान्ये घेतली असतील तर मोड आणून वापरली तर अजून पौष्टिकता वाढेल..एक काळजी घ्या फक्त त्रुणधान्य घेऊ नकात किंवा फक्त कडधान्य दोन्ही मिळूनच उपलब्ध आहेत तेवढे घ्या.म्हणजे one dish meal तयार होईल .भिजून मऊ झाले आहे आणि मोड आले की जाडसर वाटून घ्या. भज्याच्या पिठा
प्रमाणे करा आणि त्यात 1🥄 corn flour + 1🥄बेसन पीठ+चवीनुसार आणि आवश्यकतेनुसार मीठ,हिरव/ तिखट,हळद,ओवा,जिरे ,धनेपुड,
चिमुटभर सोडा .. आणि उपलब्ध असेल तर कोथिंबीर,पुदिना, कढिपत्ता, लसण,अद्रक ओल नारळही किंवा तुम्हाला आवडणार्या भाज्या सुद्धा टाकू शकता ..याची मुलांसाठी भजी बनवा,वडे करा आणि तळून घ्या.. तेलकट नको असेल तर  pattis  shallow fry करा आणि साठी थालीपीठ पण करू शकता..कोणत्याही प्रकारच्या चटण्या, दही यांसोबत खाऊ शकता...तुमचाही सुगरणपणाचे
कौशल्य वापरा अन् अन् घरातल्यांच्या आवडीनुसार बदल करा अन् मलाही सांगा..परत भेटू पुढच्या one dish meal recipe सोबत...ह्या संकल्पना बद्दल थोडसं ..म्हणजे एकच डिश अशी बनवायची यामधे जास्तीत जास्त सर्व अन्नघटक अंतर्भूत होतील आणि पोषणमूल्ये ही टिकून राहतील असा प्रयत्न विचार करून तयार केलेले पदार्थ आपले पारंपारिक पदार्थ नक्कीच असे आहेत अशा परिस्थितीत हे कौशल्य वापरून आपण ग्रुहीणी नक्कीच ..आरोग्याची काळजी घेऊ ..शकतो

सौ,वर्षा लक्ष्मणराव मुंडे ,सहशिक्षिका , 

भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबेजोगाई

संचलित,श्री खोलेश्वर प्राथमिक विद्यालय,

अंबाजोगाई जि.बीड.