भिस्त

दिंनाक: 10 Apr 2020 23:12:44

 


 

 • नको नको रे माणसा
  नको असा तू घाबरू
  मनामध्ये कोरोनाची
  नको अशी भीती धरू ।।१।।

  जरी असे भयंकर
  विषाणू हा कोरोनाचा
  कर नियमपालन
  कर प्रतिकार त्याचा ।।२।।

  नको समारंभ अाणि
  टाळ गर्दीमध्ये जाणे
  होऊ नयेच कोरोना
  कुणाच्याही संसर्गाने ।।३।।

  कर दोनही जोडून
  दुरूनच नमस्कार
  हात धुवा साबणाने
  बाहेरून अाल्यावर ।।४।।

  नको करू धावाधाव
  बस अाता घरामध्ये
  तुझे जीवनच अाता
  अाहे तुझ्या हातामध्ये ।।५।।

  तू रे स्वत:चा रक्षक
  कर प्रेम स्वत:वर
  समाजाच्या रक्षणाची
  अाता भिस्त तुझ्यावर ।।६।।

   

 • लता कोंडे
  पौडफाटा पुणे