नैसर्गिक रंग तयार करणे अगदी साधे आणि सोपे आहे. झाडांची पणे, फुलांच्या पाकळ्या, फळे यांच्यापासून नैसगिक रंग बनविता येतात. या रंगांमुळे आरोग्यास कोणताही अपाय होत नाही. रंगपंचमी सणाला अशा रंगांची मुक्तपणे उधळणहीकरता येते. तसेच घटक रंगांप्रमाणे ते दीर्घकाळ अंगावर टिकूनही राहत नाहीत. त्यामुळे सुरक्षित रंगपंचमी साजरी करणे सहज शक्यही होते.

स्वतः बनविलेल्या रंगांची उधळण करण्यात काही ओरच मजा आहे.

तर मग बनवा असे नैसर्गिक रंग....

लाल रंग तयार करण्यासाठी रक्त चंदनाचा वापर करता येतो. रक्तचंदनाच्या खोडाची भुकटी पाण्यात उकळवून थंड केल्यावर गडद रंग तयार होतो. जास्वंदीच्या फुलापासून ही लाल रंग बनविता येतो.

हळद आणि बेसनाच्या पिठापासून पिवळा रंग तयार करता येतो. तसेच पिवळ्या झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या सावलीत सुकवून त्यात बेसनचे पीठ मिसळल्यास कोरडा रंग तयार होतो.

गुलमोहर, मेहंदीची पणे आणि गव्हाचे कोंब यांची भुकटी तयार करून रात्रभर एखाद्या पीठमध्ये भिजत ठेवा. कोथिंबीर आणि पालकच्या पानांचा लगदा करून या मिश्रणात मिसळा, म्हणजे हिरवा रंग तयार होईल.

मैदा एक कप घेऊन त्यामध्ये बीटचा रस घालून गुलाबी रंग तयार होईल. रंग जर पातळ हवा असेल तर त्यामध्ये थोडे पाणी व बीटा रस घालून हा रंग पिचकारीत भरू शकतो.

वर्षा वसंत जेधे – सहशिक्षिका - नुमवि मराठी शाळा, सोलापूर