माझी सुट्टी

दिंनाक: 27 Mar 2020 12:33:06


 भार्गवी ला खूप लहानपणापासून क्राफ्ट ची खूप आवड आहे. सतत कशात तरी गुंतलेली असेल तर ती खूप खुश असते. आम्ही नेहमी काही ना काही तरी करत असतो.
सध्याची ही सुट्टी एक निमीत्त झाले. तिने स्वतः च घरातले जूने बॉक्स, सामान गोळा करून रोज एक वस्तु करायची असे ठरवले. आणि मग लापटॉप,   टीवी,रिमोट,मोबाइल या वस्तू केल्या आणि त्यामूळे तिचा A to Z आणि नंबर्स लिहीण्याचा सराव झाला. आणि यातल्या खूप कल्पना तिच्या होत्या याचा आम्हाला खूप आनंद झाला. बहुतेक गोष्टी वापरुन झालेल्या सामानापासून केल्या आहेत. उदा. काडेपेटी, वापरलेल्या उदबत्तीच्या काड्या, रिकामे बॉक्स, पुठ्ठा, संक्रांतीला लुटून आलेले हळदी कुंकू झाड म्हणून लावले आहे आणि अशा जसे सुचेल तसे तिचा मूड असेल तसे तिने बरेच केले आहे.
यातील काही गोष्टी आधी केलेल्या आहेत. ती एक ठिकाणी डे केयर ला जायची तिथे केलेलं काही आहे. या सगळ्याचा उपयोग हा झाला की ती निरिक्षण करते आणि सुचत तिला काही काही.....
मागच्या महिन्यात तिच्या जुन्या चप्पल च्या बॉक्स च घर करायच होत तिला, तिने संगितल तस मी केल आणि आमच घर तयार झाल.
सध्या सुट्टिमुळे आजी आबा आणि आम्ही सगळे घरीच आहोत. बाकी कोणाला भेटताही येत नाही. शाळेत विज्ञान प्रदर्शन चा अनुभव होता मग तिला आइडिया आवडली आणि 2 दिवस तयारी मधे गेले तिचे. सगळ्याना बाहेर गेल्यासारखे वाटेल आणि माझ्या वस्तू पण दिसतील या कल्पनेनेे खुश झाली. मग वस्तू मांडणे, माहीती सांगणे अशी तयारी झाली आणि आजचा दिवस आला. सकाळी आधी घरातले सगळे आणि मग बाकी लोकाना वीडियो कॉल वर आजी,मामा, मामी, मावशी,दादा,काकू याना प्रदर्शन दाखवण्यात आल.आणि आता अभिप्राय मागवले आहेत त्यांचे टीचरना वीडियो पाठवशील का प्लीज अशी एक मागणी होती फक्त.... तेही शक्य झालं आणि टीचर रिप्लाय आला की दिवस सार्थक झाल्यच समाधान मिळाल तिला.....

 

भार्गवी राजेंद्र पाटील
Des पूर्वप्रथमिक शाळा
टिळक रोड, पुणे