पिझ्झा

दिंनाक: 26 Mar 2020 18:42:32


पिझ्झा बेस तयार करण्यासाठी- १ वाटी पाणी, २ चमचे साखर,१ चमचा कोरडे यीस्ट,२वाट्या मैदा,१चमचा तेल,चिमूटभर मीठ.
कृती-पाणी कोमट करून त्यात साखर विरघळवून घेणे.त्यानंतर त्यात यीस्ट घालून दहा मिनिटे झाकून ठेवणे. यीस्ट फुलून येते.त्यानंतर त्यात मैदा आणि चिमूटभर मीठ आणि तेल घालून पंधरा मिनिटे मळणे.नंतर चार तास हा गोळा भांड्यात झाकून ठेवला.त्यावर सुती कापड ओले करून घालून झाकून ठेवले.
चार तासानंतर पुन्हा हलक्या हाताने मैदा भुरभुरून दोन मिनिटे गोळा हलक्या हाताने मळणे.
टोमॅटो साॅस-५ टोमॅटो कुकरला टाॅमेटाॅमधे पाणी न घालता मंद आचेवर शिजवणे.(शिट्टी करायची नाही.) नंतर सालासकट ते रगडणे आणि पेस्ट करणे.नंतर त्यात मीठ,मिरपूड घालून गॅसवर ठेवून थोडे उकळून रस आटवणे.
अन्य साहित्य-
सिमला मिरची,टाॅमेटाॅ,कांदा, ओव्हनमधे भाजलेला बटाटा,मोझेरोला चीज आणि आॅरेगॅनो मसाला (हे दोन्ही विकत आणलेले)
बेकिंग ट्रे मधे खाली थोडा रवा भुरभुरून घेणे.त्यानंतर मैद्याची पातळ पोळी तयार करुन त्यावर ठेवणे. यावर घरी केलेला साॅस, पातळ चिरलेल्या भाज्या लावून घेणे.त्यावर चीज आणि मसाले पसरून घेणे. तयार झालेला पिझ्झा ओव्हनमधे भाजून घेणे.
(मातीचा ओव्हन घरीच केला आहे. Industrial fire bricks खाली घालून त्यावर मातीचा डोम तयार केला.तीन दिवसांनी ही माती पूर्ण वाळल्यावर मग ओव्हनचा वापर सुरु केला.आम्ही यात लाकडे घालून पेटवून preheat करून घेतो आणि मग तापमान नियंत्रित करून पदार्थ भाजून शेकून घेतो.)

        दीपान्विता जोशी आणि आशुतोष जोशी