वसंतोत्सव

दिंनाक: 11 Mar 2020 11:21:11


 

   झाले वसंत ऋतूचे आगमन

   वसुंधरा पनाफुलांनी बहरली

   निसर्गाने लावण्यवतीचा शृंगार केला

   कोकिळेकचे गुंजन मन रिजवी

   आला वसंत,झाला मनी आनंद.....

  निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो.ते न ओरबडता गरजेपुरतेच आपण    घेतले पाहिजे व निसर्गाचे संवर्धन केले पाहिजे.

    पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरता सूर्याभोवती प्रदक्षिणा करते म्हणूनच आपणास पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू अनुभवास येतात. आपल्या सण-उत्सवाची रचनाही ऋतू लक्षात घेऊन केलेली आहे.माघ शुद्ध पंचमीला वसंत पंचमी अर्थात निसर्गाचा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो.स्थूलमानाने चैत्र-वैशाखात वसंत ऋतू असतो.ह्या ऋतूमध्ये सारी सृष्टी चैतन्य मयी असते.विविध फुले,फळांना बहर येतो .ह्या ऋतूंमध्ये सूर्य उत्तर गोलार्धात प्रवेश करीत असतो..आम्रवृक्षावर हिरव्या कैऱ्या लटकत असतात. कोकीळ मधुर आवाजात गुंजन करतो.

   वसंत ऋतूला संवत्सराचे द्वार,मुख मानतात. कालिदासाच्या  कुमारसंभवमध्ये तिसऱ्या सर्गातही वसंताचे वर्णन आहे.भगवदगीतेत श्रीकृष्णाने ऋतूनाकुसुमाकर  : ऋतूंमध्ये मी वसंत आहे असे म्हणून या ऋतूचा गौरव केलेला आहे.विख्यात लेखिका दुर्गाबाई भागवत यांनी आपल्या ऋतूचक्र या ग्रंथामध्ये वसंत ऋतूचे सुंदर वर्णन केले आहे.त्या म्हणतात-चैत्र हा खरा वसंतात्मा आहे.मधुमास आहे.ऋतुराज वसंताचे स्पंदन पावणारे हृदय आहे.चैत्र महिन्यात पुष्परागावर वसंत खरोखरच लोळत असतो.

      नवनिर्मिती करणारा हा ऋतू आहे.अनेक वृक्षांना नवीन पालवी फुटते.या ऋतूत औषधी वनस्पती उत्पन्न होतात.सर्व वातावरण आल्हाददायक असते.सर्व ऋतू श्रेष्ठच आहे.पण ह्या ऋतूत फळा फुलांना बहर येतो,नारळाच्या झाडाला पेंद फुटते.निसर्गाच्या हिरव्या रंगातही विविधता दिसते.

   माघ शुद्ध पंचमीला वसंतपंचमी निसर्गाचा सण आनंदाने  साजरा केला जातो.महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरभारत मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा करतात.ह्या पंचमीला नवीन पिकांची रास देवीला अर्पण करतात ,जेवणाचा नैवेद्य देवीला अर्पण करतात.सरस्वती,लक्ष्मीमातेची पूजा केली जाते.

      अशा ह्या सुंदर,आल्हाददायक, सृजनशील ऋतूचे अर्थातच निसर्गाचे आपण संवर्धन केले पाहिजे. सर्वप्रकारचे प्रदूषण थांबविले पहिजे.अन्यथा वसंत ऋतूचे सौंदर्य, कोकीळ गुंजन,दिमाख दार लटकणाऱ्या कैऱ्या, फळं फुले सर्व हरवून बसू.  असे होवू नये याची काळजी आपण घेऊया! वृक्षारोपण,वृक्षसंवर्धन करूया ,वसंत ऋतूसह सर्व ऋतूचा आनंद घेऊ या!

     नाचत,डोलत आला वसंत

      हिरव्या कैऱ्या खुणावती

      चाफा आंबाडयात खोवूया

       वसंताचा वसंत बहर जपूया.......

 

सौ.ऋतुजा रविंद्र गवस

विवेकानंद संकुल सानपाडा