चांदण्या विचारतात चांदोबाला
असा कसा रे तू
कधी कधी कोर
कधी एकदम गोलमटोल


कधी चांदोबा ढगात लपतो
चांदण्यांना मग शोधायला सांगतो
तेवढ्यात येतो वारा
ढगाला दूर पळवतो
चांदोबा मिटतो डोळे
तरी सगळ्यांना दिसतो


चांदोबा ला येतो राग
एक रात्र त्याचा
कुणालाच लागत नाही माग
कुणालाच मग करमत नाही
शोध काही थांबत नाही


चंद्रालाच येते चांदण्यांची आठवण
दुसऱ्या रात्री येतो छोटी कोर होऊन
सगळेच मग खूप खूप गप्पा मारतात
इकडून तिकडे फिर फिर फिरतात

-अतुल कुलकर्णी