शुक्रवार, दि. 24 जानेवारी 2020 रोजी सायंकाळी 5 ते 7 या वेळात, बालगंधर्व रंगमंदिरात, टी.बी. लुल्ला चॅरिटेबल फाऊंडेशन आणि शिक्षणविवेक आयोजित शिक्षण माझा वसा हा राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कार सोहळा आणि वेध भावनांचा हा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला या वेळी भाषा - राजन गौतम गरुड, जि प शाळा खोरीचापाडा, सोनावे, पोस्ट-पारगाव, ता/जि: पालघर; गणित - संपदा प्रकाश बागी, जि.प.प्राथ. शाळा घोटगे, वायंगणतगड, ता. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग; विज्ञान - स्वाती प्रमोद बोरकर, मनपा शाळा क्रमांक 174 बी, कोंढवा बुद्रुक पुणे; तंत्रज्ञान - जयदीप दत्तात्रय डाकरे, विद्यामंदीर चाफेवाडी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर; कला     - हेमंत चंद्रकांतराव बावस्कर, शहाजीनगर मनपा हिंदी शाळा चिताकँप, मुंबई; विशेष - सतीश पंडित पाटील, विद्यामंदिर भैरेवाडी, सावर्डे बुद्रुक, ता. कागल, जि. कोल्हापूर; उपक्रमशील मुख्याध्यापक - तानाजी रामचंद्र देशमुख, जिल्हा परिषद शाळा शिवणी, ता. कडेगाव जि. सांगली; या शासकीय शाळांमधील शिक्षकांना गौरवण्यात आले. तसेच डेक्कन एज्युकेशन सोसायटी- चारुता शरद प्रभुदेसाई, न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, पुणे; महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी - स्वाती दत्तात्रय गराडे कै. दा. शं. रेणावीकर विद्यालय, अहमदनगर; महर्षी कर्वे स्री शिक्षण संस्था - सुनिता पुंडलिक वांजळे     विद्यापीठ हायस्कूल, पुणे; शिक्षण प्रसारक मंडळी- भरत लक्ष्मणराव सुरसे, नू.म.वी.मुलांची माध्यमिक शाळा, पुणे; भारतीय शिक्षण प्रसारक संस्था - अनिता तुकाराम येलमटे, लाल बहादुर शास्त्री माध्यमिक विद्यालय, उदगीर, लातूर; छत्रपती शिक्षण मंडळ - भारती विजय वेदपाठक    प्राथमिक विद्यामंदिर, कल्याण; महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी - मानसी किरण वैशंपायन (उपक्रमशील मुख्याध्यापक) म.ए.सो. अद्याक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय, नवीन पनवेल, अशा खासगी संस्थांतील शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला. या वेळी झालेल्या वेध भावनांचा या सांस्कृतिक कार्यक्रमात 30 शाळांमधील 250 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. माध्यमिक शाळांच्या मुलांनी केलेले गायन आणि पूर्व-प्राथमिक- प्राथमिकच्या मुलांन केलेले नर्तन याने कार्यक्रम रंगतदार झाला. माणसाच्या आयुष्यातील नात्यांचं - भावनांचं महत्त्व अधोरेखित करत असतानाच माध्यमसाक्षर कसं असावं याचं प्रात्यक्षिक दाखवणारा कार्यक्रम मुलांच्या सादरीकरणाने बहरत गेला. या कार्यक्रमातून मुलांमध्ये असणारा सहचर्यभाव जसा दिसला, तसाच विद्यार्थी-शिक्षक यांच्यातील संवादाचे दर्शनही घडले. या सगळ्याला पालकांनी दिलेला अभूतपूर्व प्रतिसादही महत्त्वाचा होता.

या कार्यक्रमाला नाळफेम अभिनेत्री देविका दफ्तरदार, लेखक-दिग्दर्शक अभिराम भडकमकर, टी.बी. लुल्ला चॅरिटेबल फाऊंडेशनचे अध्यक्ष अॅड. किशोर लुल्ला, शिक्षणविवेकच्या कार्यकारी संपादक डॉ. अर्चना कुडतरकर, रामकृष्ण ऑईल मिलचे प्रवीणशेठ लुंकड, शिक्षणतज्ज्ञ रवींद्र वंजाडवाडकर, डॉ. शरद कुंटे, डॉ. प्रमोद गोर्‍हे आदी मान्यवर उपस्थित होते. सुरेश शेलार यांनी कार्यक्रमाचे संहिता लेखन केले, सूत्रसंचालन प्राजक्ता बेंद्रे, शर्वरी पर्वते, गजानन बहिरट अदिती दाते आणि रोहित वाळिंबे यांनी केले.