‘शिक्षणविवेक’ आणि ‘टी. बी. लुल्ला चॅरिटेबल फौंडेशन’

यांच्या संयुक्त विद्यमाने

‘शिक्षण माझा वसा’

(राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कार, २०२०)

शिक्षणाचा ध्यास घेऊन विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची इच्छा, आवड निर्माण करण्यासाठी शिक्षक सातत्याने कार्यरत असतात. आपल्याकडील माहितीला अनुभवाची जोड देत वैविध्यपूर्ण अध्यापन पध्दतींचा अवलंब करणारे शिक्षक नेहमीच कौतुकास पात्र ठरतात. या शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी ‘शिक्षण माझा वसा’ या राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्काराचे आयोजन करण्यात आलेले आहे. 

जानेवारी २०२० मध्ये होणाऱ्या या राज्यस्तरीय पुरस्कार वितरणासाठी महाराष्ट्रातील केवळ पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका व जिल्हा परिषदांच्या शाळांतील शिक्षकांची ज्ञानरचनावादावर आधारित नाविन्यपूर्ण उपक्रमांची नामांकने मागवत आहोत. यामध्ये ५ अध्यापन विषय (१.भाषा:-मराठी/हिंदी/इंग्रजी, २.गणित, ३.विज्ञान, ४.कला:-चित्र/नाटय/शिल्प/संगीत, ५.तंत्रज्ञान), एक उपक्रमशील मुख्याध्यापक व एक विशेष पुरस्कार अशा सात पुरस्कारार्थींची निवड केली जाणार आहे.

 

पुरस्काराचे स्वरूप:

रू. ५,००० रोख रक्कम, सन्मानचिन्ह व मानपत्र

 

नामांकनासाठीचे निकष व नियम:

  • नामांकन पाठवणाऱ्या शिक्षकाचे कमाल वय ४५ वर्षे असावे. (दि. ३० नोव्हेंबर, २०१९ पर्यंत)
  • जन्मदाखला पुरावा आवश्यक आहे. (उपक्रमशील मुख्याध्यापक पुरस्कारासाठी वयाची अट नाही.)
  • किमान ५ वर्षे एका उपक्रमाची अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता सिद्ध झालेली असावी.
  • नामांकन पाठवण्याची अंतिम दिनांक : बुधवार, दि. २० नोव्हेंबर २०१९.
  • निवड समितीचा निर्णय अंतिम असेल.

 

नामांकन पाठवण्याचे स्वरूप:

आपल्या उपक्रमाची माहिती पुढील मुद्यांच्या आधारे पाठवावी.

  • शिक्षकाचे नाव, शाळेचे नाव व पत्ता, उपक्रमाचे नाव, उपक्रमाची गरज, उपक्रमाची कार्यपद्धती व अंमलबजावणी, उपक्रमात आलेल्या अडचणींवर केलेल्या उपाययोजना, निष्कर्ष, पुढील नियोजन.
  • उपक्रमासंबंधीची छायाचित्रे.
  • वरील माहिती ‘शिक्षणविवेक’, म.ए.सो. भवन, १२१४-१२१५ सदाशिव पेठ, पुणे ३० या पत्त्यावर कुरिअरद्वारे किंवा [email protected] या मेल आयडीवर पाठवावी.
  • किंवा ही सर्व माहिती online भरण्यासाठी www.shikshanvivek.com या शिक्षणविवेकच्या संकेतस्थळाला भेट देऊन

    https://forms.gle/pbciJc1yFjZsTKHh9 

  • या  लिंकवरील गुगल फॉर्म भरावा. फॉर्म भरल्यानंतर खालील संपर्क क्रमांकावर मेसेज करावा.

संपर्क : ७७०९५८७११९ / ७०४५७८१६८५

सदर माहिती आपल्या परिसरातील शिक्षकांना पाठवून प्रचार व प्रसार करावा.