मांगल्याचे प्रतीक, गणपतीची स्थापना

सार्वजनिक उत्सवाची कल्पना, सुचली लोकमान्यांना ॥

होताच काळ तसा, समाज प्रबोधनाचा

शोधला मार्ग त्यांनी, सर्वांना एकत्र आणण्याचा ॥

झाली सुरुवात जेव्हा, होती पावित्र्याची जाण

आज मात्र कुणालाच, नाही कशाचेच भान ॥

येतो मनात विचार, जर गणपती लागला बोलू

म्हणेल, बदलला काळ, आपणही बदलू ॥

विटले माझे कान, कंटाळलो मी आता

ढोल-ताशांचा गजर, कशासाठी करता ॥

मीच सुखकर्ता, मीच दु:खहर्ता

लाखोंचा खर्च, कशासाठी करता ॥

करेल जो उपयोग, विधायक कार्याला

होईन मी प्रसन्न, त्याच भक्ताला ॥

- लता कोंडे

शिशुविहार प्राथमिक शाळा