शिक्षणविवेक आणि माय पपेट स्टोरी यांच्या संयुक्त विद्यमाने 
आंतरशालेय पपेट सादरीकरण स्पर्धा २०१९.
📌 विषय : कुटुंब
📌 स्पर्धा कालावधी : दि. १९ ते २१ ऑगस्ट, २०१९ आणि २३ ऑगस्ट, २०१९
स्पर्धेविषयी
📌 विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांचे वेगवेगळे गट असावेत.
📌 विद्यार्थी, पालक, आणि शिक्षक यांची सादरीकरणे वेगवेगळ्या दिवशी असतील.
📌 एका गटात जास्तीत जास्त तीन स्पर्धक असावेत.
📌 स्वरचित गोष्ट स्व हस्ताक्षरात स्व साक्षांकित केलेली प्रत दि.१० ऑगस्ट २०१९ पर्यंत कार्यालयात पाठवावी.
📌 स्वतः तयार केलेल्या पपेटस ना विशेष गुण देण्यात येतील.
📌 स्पर्धकांनी पडद्याच्या मागूनच सादरीकरण करावे.
📌 संवाद किंवा गीत पाठांतर केलेले असावे. (बघून वाचू किंवा म्हणू नये.)
📌 परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. 
वयोगट आणि सादरीकरण कालावधी
१. पूर्वप्राथमिक विभाग : ०५ मि.
२. इ. १ली ते २री : ०५ मि.
३. इ. ३री ते ४थी : ०८ मि.
४. इ. ५वी ते ७वी : १० मि. 
५. इ. ८वी ते ९वी : १० मि.
६. शिक्षक आणि पालक गट : १५मि.
शुल्क
रु. ३० (प्रत्येक विद्यार्थी गटासाठी)
रु. ५० (प्रत्येक शिक्षक/पालक गटासाठी)
रू. २० (स्वरचित लेखन)
पूर्वनावनोंदणी आवश्यक - शनिवार दि. १० ऑगस्ट, २०१९ पर्यंत.

स्थळ - स्वा. सावरकर अध्यासन केंद्र, डेक्कन कॉर्नर, पुणे - ३०
संपर्क :- ७३०४४०१५२२, ७०४५७८१६८५.
👍👍👍👍👍