‘मुलं’ हा आपल्या सर्वांचाच जिव्हाळ्याचा, कौतुकाचा आणि आनंद निर्माण करणारा समाजातील एक घटक. मात्र ‘किशोर वय’ हा प्रत्येक मुलाच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा. या वयात मानसिक, भावनिक, शारीरिक, बौद्धिक अशा विकासाची गती अधिक असते; आणि दोन पिढ्यांमधे असणारे वयाचे अंतर हीच संवादासाठी अनेकदा ‘समस्या’ ठरते. म्हणूनच या मुलांना योग्य ध्येयापर्यंत नेण्यासाठी, सुजाण नागरिक बनवण्यासाठी आणि याहीपेक्षा त्यांची ‘माणूस’ म्हणून घडण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी हा समुपदेशन अभ्यासक्रम निश्चितच उपयोगी ठरेल. हा अभ्यासक्रम म्हणजे समुपदेशनाच्या माध्यमातून, व्यक्तिगत हिताकडून - सामाजिक हिताकडे नेणारा मानसशास्त्रीय प्रवास आहे. मुलांमध्ये सुसंवादातून सकारात्मक दृष्टीकोन विस्तारणारी वाटचाल आहे. कुटुंबाच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, समाजाच्या दृष्टीने जरी ते एक ‘वादळ’ असले, तरी या ‘वादळा’ला सुयोग्य दिशा देणारा हा अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमांतर्गत आपण खालील विषय शिकणार आहोत –

किशोरवयाची वैशिष्ट्ये

 • या वयातील कालखंडाची ओळख

किशोर वयातील विविध विकास टप्पे

 • शारीरिक विकास
 • बौद्धिक विकास
 • सामाजिक विकास
 • भावनिक विकास
 • नैतिक विकास
 • व्यक्तिमत्व विकास
 • लैंगीक विकास

कौटुंबिक आणि इतर नातेसंबंध

 • नात्याचे समायोजन
 • कौटुंबिक संबंधावर परिणाम करणारे घटक
 • मित्र-मैत्रिणी
 • स्त्री-पुरुष भेद

वर्तन समस्या आणि उपाययोजना

 • चोरी, फसवणूक
 • मानसिक व शारीरिक छळ
 • व्यसनाधीनता, मनाची अस्थिरता
 • वर्तन समस्यावर परिणाम करणारे घटक

किशोर वयातील अभिरुची/आवड

 • मनोरंजन, सामाजिक
 • शैक्षणिक, व्यावसायिक, धार्मिक

किशोरवयीन मुलांशी संवाद

 • सुयोग्य संवादाचे महत्त्व
 • पालक, शिक्षक, समुपदेशक, किशोर मित्र संवाद

समुपदेशनाची आवश्यकता

 • समुपदेशनाचे महत्त्व
 • समुपदेशनाची वैशिष्ट्ये