अनेक शौर्य चक्रे मिळवणारी आणि स्वातंत्र्यपूर्व काळात व्हिक्टोरिया क्रॉस पटकवणारी मराठा लाईट इंफंट्री प्रेसिडेन्ट कलर्सने अलंकृत आहे. ‘शिवाजी महाराज की जय!’ या उद्घोषाने गनिमाच्या छातीत धडकी भरवणारी ही पायदळ सेना मरहठ्ठ्या मर्दाची अस्मिता पार्ले स्टेशन जवळ दिसणारी पाटी से. लेफ्टनंट मकरंद घाणेकर पथ आजही तरुणांना प्रोत्साहन देते.

You are a mother of a solider you should not worry for me.

समरांगणावर उतरण्यापूर्वी आपल्या वीर मातेला शेवटच्या पत्रातील त्याचं हे सांत्वन. बांगलादेश मुक्ती संग्रामात इंटेलिजन्स ऑफिसर म्हणून पूर्व पाकिस्तानात घुसून परत आला आणि ५ डिसेंबर १९७१ ला कोछंडपूर कालीगंज आघाडीतून तीस जवानांना घेऊन पार घुसला ते शत्रूच्या शिबिरावर. या आधुनिक बाजी प्रभूने गनिमाला टिपत टिपत पार मुसंडी मारली आणि विद्युतगतीने त्याची पलटन चार किलोमीटर पूर्व पाकिस्तानमध्ये घुसली. सर्वजण ललकार करत होते. हर हर महादेव आणि हा मुंबईकर नेतृत्व करत होता त्या तुकडीचे.

निधड्या छातीचा मकरंद घाणेकर नरसिंह रूप घेत त्वेषाने लढत होता. सुभेदार सर्जेराव कंक यांना मकरंद म्हणाला, शेलारमामा, चला पुढे आपण ढाक्यात पोहोचून मलमल लुटू या! ‘होय साहेब’, उत्तर मिळाले. अंधाराचा फायदा घेत पाच पाकी सैनिक मकरंदवर तुटून पडले; पण मकरंद डगमगला नाही. त्याने चौघांना बंदुकीच्या दास्त्याने धाराशाही केले; पण एक गोळी सू...सू करत आली आणि मकरंद कोसळला तरीही स्वत:ला सावरून गोळी मारणार्‍याला छेदूनच तो सर्जेरावांना म्हणाला Subhedar, Advance take over command and fight it out. हर हर महादेव एकांगीची रणभूमी त्या काळोख्या रात्री उजळून निघाली. पवित्र झाली Sacriting his young life he displayed grand patriotisms असे म्हणत पाकिस्तानी ऑफिसनेही त्याच्या शौर्याला सलाम केला.

- कॅप्ट. विनायक अभ्यंकर