मित्रांनो, मागील लेखामध्ये आपण भारताची अंतराळयात्रा कशी सुरू झाली ते संक्षेपात पाहिले. आता पाहणार आहोत भारताने अंतराळक्षेत्रामध्ये काय कामगिरी बजावली जेणेकरून अंतराळ क्षेत्रामध्ये भारताचे नाव आदराने घेतले जाऊ लागले.

भारताने आर्यभट्ट आणि रोहिणी हे दोन उपग्रह यशस्वीरीतीने प्रक्षेपित केल्यानंतर आधुनिक रॉकेटवर आपले लक्ष केंद्रित केले. या भारताच्या अवकाश संशोधनात अजून एका वैज्ञानिकाचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल ते म्हणजे डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम. यांना भारताचा मिसाईल मानव म्हणून ओळखले जाते. भारताच्या मिसाईल आणि उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी लागणारे रॉकेट यांच्या प्रगतीमध्ये कलाम यांचा सिंहाचा वाट आहे. भारताने याच काळात झडङत आणि ॠडङत ही अत्याधुनिक रॉकेट बनवली आणि आपले इतर काही उपग्रहसुद्धा पाठवले. ज्यामध्ये १९९५ साली भारताने पहिल्यांदाच विदेशी उपग्रह आपल्या रॉकेटच्या मदतीने यशस्वीरीतीने अंतराळात पाठवले. त्यानंतर भारताने ८ मी २००३ रोजी ॠड-ढ-१ ह्या नावाचा उपग्रह आकाशात पाठवला. त्याच नंतर भारताने एर्वीड-ढ नावाचा शिक्षण संबंधी उपग्रहसुद्धा २० सप्टेंबर २००४ साली यशस्वीरीतीने अवकाशात पाठवला. अशा प्रकारे भारताची यशस्वी मजल सुरू झाली. मधील काळातच राकेश शर्मा भारताचे पहिले अंतराळवीर ठरले; ज्यांनी भारत आकाशातून कसा दिसतो यावर सारे जहा से अच्छा असे उत्तर दिले. ते रशियाच्या माध्यमातून अवकाशात भारताचे नेतृत्व करत होते.

यानंतर भारतच्या या अंतराळ स्पर्धेत मोठा टप्पा आला तो म्हणजे चांद्रयान-१ हे अंतराळयान. भारताने ऑक्टोबर २००८ साली हे यान अवकाशात प्रक्षेपित केले. त्यानंतर ते यान १४ नोव्हेंबर २००८ या दिवशी चंद्राच्या कक्षेत पोहोचले. यांमध्ये ५ भारतीय यंत्रे आणि ६ इतर देशांची यंत्रे बसवण्यात आली होती. या यंत्रांच्या माध्यमातूनच चंद्राच्या पृष्ठभागाचा सखोल अभ्यास केला जाणार होता. यामध्ये एक यंत्र (प्रोब) होते; जे चंद्रावर जाऊन आदळले आणि त्याने चंद्राच्या पृष्ठभागावरील नमुने गोळा केले आणि चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी आहे हे निश्चितपणे सिद्ध केले. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण भारत हा चंद्रावर पाणी आहे हे सिद्ध करणारा प्रथम देश आहे. यानंतर भारताचे सर्व देशांकडून प्रचंड कौतुक झाले आणि भारताचे स्थान अंतराळ स्पर्धेत मजबूत झाले.

यानंतर भारताने ॠ-ॠ-छ आणि छ-तखउ असे दोन उपग्रह अंतराळात पाठवले. हे उपग्रह हे भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. आपण आपले स्थान निश्चित करण्यासाठी जी ॠझड प्रणाली वापरतो ती याआधी बाहेरच्या देशांकडून अथवा बाहेरील देशांच्या उपग्रहांवरून आपण वापरायचो. त्यामध्ये प्रचंड पैसा आणि सुरक्षा असे दोनही मुद्दे यायचे. परंतु या उपग्रहांद्वारे भारत आता स्वतःची विकसित केलेली प्रणाली वापरू लागला आहे; त्यामुळे भारताच्या सीमांवरसुद्धा चोख नजर ठेवणे सहज शक्य झालेले आहे.

भारताच्या या अंतराळ यात्रेमध्ये आजवर मानला गेलेला सर्वांत महत्त्वाचा टप्पा म्हणजे ‘मंगळयान-१’. भारताने ५ नोव्हेंबर २०१३ साली हे यान प्रक्षेपित केले आणि २४ सप्टेंबर २०१४ साली या यानाने यशस्वीरीत्या मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला. याद्वारे मंगळाच्या कक्षेत पहिल्याच प्रयत्नांत यशस्वीरीतीने यान पाठवणारा भारत हा पहिला देश बनला. त्याचप्रमाणे एखाद्या विदेशी चित्रपटाच्या वित्तव्यवस्थेपेक्षा कमी खर्चात भारताने हे करून दाखवले. या मोहिमेनंतर भारत हा विकसनशील देश नसून लवकरच महासत्ता होण्याच्या वाटेवर आहे, हेच जणूकाही भारताने सिद्ध केले आहे.

यानंतर भारताने ८ सप्टेंबर २०१६ साली प्रथम २० उपग्रह आणि नंतर १५ फेब्रुवारी २०१७ला १०४ उपग्रह पाठवून जागतिक विक्रम नोंदवला. यामुळे आता भारतास अंतराळ क्षेत्रात प्रचंड मानाचे स्थान आहे. त्याचप्रमाणे भारताचा अंतराळ प्रकल्प हा सर्वांत कमी खर्चिक आणि सर्वांत जास्त विश्वासार्ह समजला जातो. या पुढे भारताने गगनयान यापुढील मोहिमेची आखणी सुरू केली आहे, ज्याद्वारे भारतीय अंतराळवीर ७ दिवस आपण बनवलेल्या यानामध्ये राहतील आणि विविध प्रयोग करतील.

त्याचप्रमाणे ‘आदित्य-१’ हे सूर्यावरील मिशन आणि येत्या काळात गुरू आणि शुक्र यांच्यावरसुद्धा काही मिशन पाठवण्याचा भारताचा मानस आहे. भारत या अवकाश स्पर्धेत जरी काहीसा उशिराने उतरला असला तरीसुद्धा भारताने या क्षेत्रात नक्कीच आपला ठसा उमटवून आपले वर्चस्व सिद्ध केलेले आहे. या पुढील काळात आपल्यातील काही लहान मंडळीसुद्धा काही वर्षांनी या क्षेत्रात मोठं काम करताना दिसतील. मी आशा करतो की, आपल्याला ही लेखमाला नक्की आवडली असेल. याविषयी आपले प्रश्न, प्रतिक्रिया जरुर कळवा!

- अक्षय भिडे