सुरंगी

दिंनाक: 19 Jun 2019 15:49:33


 

सुरंगी हे याचे मराठी नाव तर संस्कृत –पुन्नाग असे. आहे. याचे शास्रीय नाव – मममेडू सुरीगा तसेच लॉगिफोलीयस आहे. कुल – गटीफेरी (कोकम) आश्लेषा –नक्षत्राचे हे झाड.

हा सदापर्णी वृक्ष पश्चीम घाट कोकण मलबार गर्द – जंगलात (खंडाळा ते दक्षिणेस मलबार) कोईमतूर पर्यंत किनारपट्टीत आढळतो. उंची सुमारे १२-१८ मी. घेर साधारण १.८ मी. असते. वेगुर्लेत याला योग्य हवामान आहे. कुडाळ सावंतवाडीत तर लोक याच्याद्वारे अर्थार्जन करीत आहेत. दापोली कृषीसंशोधन केंद्रातर्फे शोध लावले जात    

तो मादागास्कर, न्युगिनी, आफ्रिका व फिजी येथील प्रदेशात लावलेला आढळतो. ७० वर्षे ही सुरंगी जगते.

पाने १२ ते २३ से.मी. लांब जाडसर काळपट वरच्या अंगावर पिवळट ठळक रेषा असतात. पाने साधी मोठी थोडी बकुळीच्या पानासारखीच दिसणारी हिरवी तुकतुकीत टोकदार अंडाकृती, चिवट अग्र तीक्ष्ण लालसर दंडाची पाने आतल्या फांद्याच्या थांगपत्ता लागू देत नाहीत. ह्या पानाच्या हिरव्या गर्द घुंघटाआड हि सुरंगीची फुले दडलेली असतात. याची साल चॉकलेटी रंगाची असते. याचे अंतर लाकूड लाल कडक असते. खोडाला काप दिल्यास लाल डिंकासारखा रस निघतो. फेब्रु – मार्च मध्ये याची फुले येतात. ती ४ पाकळ्यांची छोटी, गुलाबी, पांढरी, पिवळट अशा रंगाची फुले येत्क़ात. हि फुलेही बकुळ फुलासारखी खूप फांद्यावर लागतात. त्यांचा अत्यंत मोहक सुंगध लाबुनच आपल्याला प्रभावित करतो.  लालसर किरमिजी देठावर पांढरे वाटाणे चीकटवावे असे दिसते. कळ्या उमलल्यावर पाढर्या पाकळ्यातून असंख्य सोनपिवळे केशर दिसू लागतात. साधारण १-७ से.मी. व्यासाची हि फुले झुबक्यांनी येतात. काही पाकळ्या गळतात. पण नाजूक पुंकेसरांच्या मुळे फांद्या भरून जातात. मृदुफळे पावसात पिकतात,ती रसाळ खाण्यायोग्य असतात. ती गोल लांबट २.५ से.मी. लांब, त्यात एकच बी असते.

सुरंगीची कळ्या, फुले पहाटेच काढावी लागतात. मग गजरे करतात त्यांना वळेसर म्हंटले जाते. हि दक्षिण कोकणाची स्पेशालिटी. कोकणच उष्ण-दमट हवामान हिला चालते. मोगरा मदनबाण जाई जुई जशी शहरात चालते तशी कोकणात बकुळ, अबोली, शेवंती, सुरंगीची ! फुलांच्या पुंकेसरांना तांबडा नागकेसर म्हणतात सुकलेल्या लाल कळ्यांचा उपयोग रेशीम बनवण्यासाठी करतात. याचे नागकेसर दुर्गंधी नाशक आहे. त्यात घाम कमी करण्याचा गुण आहे.

सुरंगीचे गजरे बाजारात नेतानाही (वासामुळे पुंकेसरांमुळे) त्यावर मधमाशी ,कीटक बसतात याची सुवासिक फुले पूजेसाठी शरीर सुशोभित करण्यासाठी वापरतात. त्या फुलांपासून अत्तर काढतात. लाकूड लाल, कठीण, टिकाऊ असल्याने घरबाधनीस उपुक्त असते. ताज्या कळ्या सौम्य उतेजक, गॅस काढणारे अग्निमाध्य व मुळव्याधीवर गुणकारी असतात. सौंदर्यप्रसाधनातही ह्याचा उपयोग होतो. संस्कृतमधल्या ह्या पुन्नगाची कमी होत चाललेली संख्या वाढवण्याचे प्रयत्न मात्र होणे अत्यंत आवश्यक आहे.

- सौ. मीनल पटवर्धन