दोस्तांनो, पुस्तक वाचत असताना बऱ्याचदा चालू पान लक्षात ठेवण्यासाठी आपण पान दुमडतो किंवा त्यात वेगवेगळ्या वस्तू ठेवतो. त्याऐवजी चालू पान लक्षात ठेवण्यासाठी बुकमार्क हा उत्तम पर्याय आहे. आज आपण नाविन्यपूर्ण बुकमार्क तयार करायला शिकूयात. 

साहित्य

जाड कागदाची रंगीत पाकिटे (एन्व्हलप्स), फेव्हिकॉल आणि रंग.

कृती

सुरवातीला पाकिटाचा १.५ ते २ आकाराचा कोपरा कापून घ्या. हा त्रिकोण शक्यतो समभूज असावा. त्यावर रंगीत खडूच्या साहाय्याने पानं, फुलं, किंवा जे तुम्हाला आवडेल ते चित्र काढून तो डेकोरेट करा.

तसेच तुम्ही पाकिटाचा सरळ आकार कापूनही बुकमार्क तयार करू शकता.

हा बुकमार्क पुस्तकाच्या पानाच्या कोपऱ्याला लावता येतो आणि दिसतोही छान.

- मेधा सुदुंबरेकर