शिक्षणविवेक म्हणजे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्या अभिव्यक्तीचे हक्काचे व्यासपीठ. शिक्षणविवेकच्या उपक्रमात मुख्याध्यापकांपासून  अगदी पालकांपर्यंत सर्वजण सहभागी होत असतात. सुट्ट्यांच्या दिवसातील काही वेळ पालकांना मुलांसोबत घालवता यावा यासाठी शिक्षणविवेकने सर्जनशील पुनर्वापर स्पर्धा आयोजित केली आणि महिन्याभरात कागद हा विषय घेऊन बनवलेल्या वस्तूंची छायाचित्रे शिक्षणविवेककडे जमा झाली. इयत्तेनुसार विद्यार्थ्यांचे पाच गट होते. स्पर्धकांनी कागदापासून वैविध्यपूर्ण वस्तू बनवल्या होत्या. पेन स्टँड, टी कोस्टर्स, बुलेट, सूर्यमाला, पक्ष्यांना दाणे ठेवायचा स्टँड, स्टडी टेबल अशा अनेक वस्तू बनविल्या होत्या. विशेष म्हणजे या वस्तू बनवताना आई किंवा बाबा आणि विद्यार्थी यांनी एकत्र वेळ घालवला होता. हाच स्पर्धेचा उद्देश साध्य झाल्याचे मुलांनी लिहिलेल्या माहितीवरून लक्षात येत होते. उपयोगात नसलेल्या कागदाचा वापर, वस्तूचा उपयोग, आकर्षकता, कल्पनाशक्तीचा वापर, मुलांचा आणि पालकांचा सहभाग आणि परीक्षकांचे मत या निकषांवर प्रत्येक गटातून तीन विद्यार्थ्यांच्या वस्तू निवडल्या गेल्या. निवड होण्या न होण्यापेक्षा मुलांसोबत पालकांना वेळ घालवता आला ही सर्वांसाठी मोठी समाधानाची बाब होती. या स्पर्धेत पुण्यासोबतच मालवण, दापोडी, सोलापूर, सांगली अशा ठिकाणाहून विद्यार्थी आणि पालकांनी सहभाग घेतला होता. सर्व पालक आणि विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन!

या स्पर्धेचा निकाल दि. १ जूनला शिक्षणविवेकच्या संकेतस्थळावर www.shikshanvivek.com  येथे पाहायला मिळणार आहे. धन्यवाद. 

 

सर्जनशील पुनर्वापर स्पर्धा २०१९ निकाल –

 

गट क्र. १ पूर्वप्राथमिक विभाग

प्रथम क्रमांक – दिपान्विता जोशी – शुभेच्छा वही आणि लिफाफा.

द्वितीय क्रमांक – तन्वी गंभीरे – एन.ई.एम.एस. प्री प्रायमरी स्कूल, पुणे – कागदी पपेट.

तृतीय क्रमांक – राधा भाटवडेकर – spm इंग्रजी माध्यम शाळा, पुणे - पेन्सिल स्टँड.

 

गट क्र. २ – इयत्ता १ली व २री

प्रथम क्रमांक – गायत्री जाधव – कै.वा.दि. वैद्य मुलींची प्राथमिक शाळा, पुणे – कागदी बाहुली.

द्वितीय क्रमांक – सिद्धांत पटवे – नवीन मराठी शाळा, पुणे - कागदी फुलांची परडी.

तृतीय क्रमांक – पूर्वा पाटील – डी.ई.एस.प्रायमरी स्कूल, पुणे – वर्तमानपत्राची टोपी.

 

गट क्र. ३ – इयत्ता ३री व ४थी

प्रथम क्रमांक – सनंदन देशपांडे – शिशुविहार प्राथमिक शाळा, एरंडवणा, पुणे – सूर्यमाला.

द्वितीय क्रमांक – मंजिरी जठार - डी.ई.एस. प्रायमरी स्कूल – कागदाची परडी व फुले.  

तृतीय क्रमांक – अथर्व येवलेकर – नवीन मराठी शाळा, पुणे – टी कोस्टर्स.

 

गट क्र. ४ – इयत्ता ५वी ते ७वी

प्रथम क्रमांक – ऐश्वर्या घुगे – कै.वि.मो. मेहता माध्यमिक शाळा, जुळे सोलापूर -  सूप.

द्वितीय क्रमांक – अविनाश देशपांडे – कै.वि.मो. मेहता माध्यमिक शाळा, जुळे सोलापूर - स्टडी टेबल.

तृतीय क्रमांक – अवधूत बारटक्के – स्व. अंबरचंदजी मुनोत शिक्षण संस्था प्राथमिक विभाग, पुणे – लेटर बॉक्स.

 

गट क्र. ५ - इयत्ता ८वी व ९वी

प्रथम क्रमांक – हर्षद पाटील – कै.वि.मो.मेहता माध्यमिक शाळा, जुळे सोलापूर – बुलेट.

द्वितीय क्रमांक – कनक दळवी – जय गणेश इंग्रजी माध्यम शाळा, मालवण - पक्ष्यांसाठी दाणे ठेवायचा स्टँड.

तृतीय क्रमांक – वेदिका भामरे – केंद्रीय विद्यालय, दापोडी - कागदी टोपली.

 

क्रमांकप्राप्त विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे हार्दिक अभिनंदन!