मधुमालती

दिंनाक: 29 May 2019 14:33:48


 

मधुमालती ही झुडूप किंवा लता या प्रकारात असते. तिच्या साधारण १८० प्रजाती आहेत. त्यापैकी १०० प्रजाती चीन, भारत, युरोप तसेच उत्तर अमेरिकेत प्रत्येक देशात १८-२० प्रजाती आहेत. त्यापैकी सर्वात प्रसिद्ध प्रजाती लोनिकेरा जैपेनिका ( ही जपानी मधुमालती किंवा चीनी ) लोनिकेरा पेरीक्लिमेनस किंवा लोनिकेरा सेमपर्विरन्स आणि इतरही जाती आहेत. या प्रजातींच्या काही फुलांकडे खूप पक्षी आकर्षित होतात. हिला मधुमालती हे नाव खरच सार्थक ठरत. कारण हिचा खाण्यालायक मध आपल्याला मिळतो. आशिया तसेच एकूण विश्वात शोभेच झाड म्हणून लावलं जातं किंवा तसंही ते आपोआप पसरतं.

कन्नडमध्ये हिला तमित तर मल्याळम आणि तेलगु मध्ये तिला कानाकाम्बरा महाराष्ट्र म्हणतात आणि गोव्यात तिला अबोली म्हणून ओळखतात. गोव्याचे हे राज्यफुल आहे. दोन प्रकारच्या रंगात ती एक फिकट नारंगी तर दुसरी रतन अबोली गडद नारंगी रंगात दिसतात. त्या बहुधा कळ्यांच्या रुपात दिसतात.

हे सतत फुलणारे झाड आहे. त्याच्या पाकळ्या पंखा(पर)सारख्या पातळ, लटकत असतात. हे १ मीटर पर्यंत झाड वाढते ते वर्षभर कोणत्याही वेळी ते दिसते. ह्या पाकळ्या ३ ते ४-५ अशा चारही बाजूला पसरलेल्या दिसतात. यांचे रंग नारंगी (फिकट व गडदही) तसेच लाल, पिवळे ही असतात. हे झाड कमी माती, पाण्यातही आपल्याला हिरवाई देते. सावली देते. हे अंगणात लावल्याने रंगीत फुलांनी घर, ऑफिस, भिंतीवर, प्रवेशद्वार, कधी किनाऱ्यावरही लावले जाते. याच्या फांद्या मऊ असल्याने पटकन कापल्या जातात. यांची फार काळजीही घ्यावी लागत नाही. एकदा का ते नीट जगलं की कमी पाणी दिले तरी छान वाढतच राहतं.

ही लता वातावरणातील कार्बनडायऑक्साईड शोषून आपल्याला ऑक्सिजन देते. तसेच हिची पाने धुळीच्या कणांची संख्या कमी करते. आपल्याला संरक्षण मिळते. ही वेल पाण्याची वाफ उत्सर्जित करते. त्यामुळे हवेतील तापमान व कोरडेपणा कमी होतो. ही दाट वाढते त्यामुळे घरांच्या भिंतीवर ही उन्हाची झळ कमी होते. त्यामुळे घराचे तापमान सामान्य राहते. हिच्या फुलांचे गुच्छ घरभर सुगंधी करून जाते आणि जणू ती खोली प्रसन्न होऊन जाते. हे काम ती करते. पर्यावरण संरक्षणाचं कामही करते. हे झाड अनेक रोगांना दूर तर ठेवतेच पण घर ताजेतवाने राहते. आणि मुख्य म्हणजे नैसर्गिक वातावरण मिळते जे आपल्या प्रकृतीला चांगले असते. तसेच समशीतोष्ण हवेतही ती वाढते. एकदा फुलल्यावर ते बरेच दिवस ताजेच झाडावर राहते. काही वेळेला पांढरी मधुमालतीही आपल्याला दिसते. त्यांची मागणी देवळात देवीला हार करून घालणे तसेच बायकाही माळा डोक्यात माळतात.

हिचे फायदे पाहू जाता – हिच्या पाना, फुलांचा रस मधुमेह रोगासाठी उपयुक्त आहे. तप सकाळी रिकाम्या पोटी घ्यायचा, नुसत्या पानांचा रसही गुणकारी असतो. हिच्या फुलांपासून आयुर्वेदात वसंत कुसुमाकर नावाचे औषध बनविले जाते. ह्या फुलापानांचा रस पोटदुखीवरही गुणकारी आहे. शरीराच्या अशक्ततेवरही हा रस आपण घेऊ शकतो. ताप, सर्दी, पडशावर १ ग्रॅम हिची पाने + फुले + १ ग्रॅम तुळस पाने घालुन काढा घेण्याने फायदेशीर होते. .........मध्ये ही फुलांचा रस ३-४ ग्रॅम साखर / मधातून घ्यावा. एकूणच स्त्रियांच्या मासिक धर्मासंबंधी काही त्रास असो. तो ह्या रसामुळे खूप फायदेशीर ठरतो.

- मीनल पटवर्धन