फ्रुट सॅलड

दिंनाक: 28 May 2019 12:22:28


 

साहित्य
द्राक्ष, डाळिंब, अननस, पपई, सफरचंद इ. फळे, कस्टर्ड पावडर, दुध, साखर.


कृती
एका पातेल्यात दूध गरम करायला ठेवा. एका छोट्या वाटीत तीन-चार चमचे दूध घेऊन त्यात कस्टर्ड पावडर मिसळू घ्या. सर्व गुठळ्या मोडून घ्या. उकळत्या दुधात तयार कस्टर्ड पावडरचे मिश्रण घालून सतत हलवत राहा. मिश्रण घट्ट होईपर्यंत हलवा. नंतर साखर घालून मिश्रण दोन मिनिटांसाठी उकळवा. तयार कस्टर्ड फ्रिजमध्ये थंड करण्यास ठेवा. फळे स्वच्छ धुऊन बारीक कापून घ्या. कस्टर्डमध्ये बारीक चिरलेली फळे मिक्स करून सर्व्ह करा.
सुट्टीत नक्की करून बघा...टेस्टी फ्रुट सॅलड. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही फळे घालून हे सॅलड करू शकता.