खेळाचे ठिकाण – मैदानावर किंवा आत

वयोगट – ७ ते १५

किती जण खेळू शकतात ? – ३ जणांचा एक गट अशा ४ किंवा जास्त जोड्या.

खेळ कसा खेळायचा ?

३ जणांचा १ गट, असे ४ ते ५ किंवा जास्त गट करावेत. प्रथम पहिल्या मुलाचे डोळे कापडाने बांधावेत. त्याच्या मागील मुलाने त्याच्या खांद्यावर हात घट्ट पकडावेत व ३ऱ्या मुलाने २ऱ्या मुलाच्या खांद्याला घट्ट पकडावे. २ऱ्या मुलाच्या हातात एक पिशवी अडकवावी. खेळ सुरु करण्यासाठी लीडरने शिट्टी वाजवताच बॉल सर्वत्र पसरून टाकावेत. अशा वेळी फक्त मागील मुलाने पुढच्यास सूचना द्याव्यात. बॉलपर्यंत लवकर पोहोचण्यासाठी ५ पावले चाल-उजवीकडे, डावीकडे थोडे मागे, पुढे अशा सोयीनुसार सूचना मोठ्यांदा द्याव्यात. बॉलजवळ पोहोचताच ‘खाली वाक’ म्हणताच संपूर्ण गटाने वाकून हात न सोडता हाताने चाचपून सूचनेप्रमाणे बॉल गोळा करण्याचा प्रयत्न करावा. सर्वात शेवटी जास्त बॉल कोणत्या गटाने गोळा केले, त्याप्रमाणे १, २, ३ नंबर लावावेत.

समजा, दोन गटांची टक्कर होत आहे, असे दिसल्यास ‘सावधान’ असे ओरडताच १ल्या मुलाने चालण्याचे थांबावे किंवा मागील मुलांनी पुढच्याच्या खांद्यावर बोटाने दाबावे ; म्हणजे थांबण्याची सूचना मिळेल. मग दिशा बदलून बॉलजवळ लवकर पोहोचावे व बॉल ताब्यात घ्यावा.

या खेळातून काय मिळते ?

  • पुढच्याचे डोळे बांधले असले, तरी आपल्याच गटाच्या मुलाच्या आवाजाने बरोबर दिलेली सूचना ऐकून त्याची अचूक कृती करणे.
  • कर्ण-हस्त समायोजन वाढते.