मँगो स्वीट राईस

दिंनाक: 24 May 2019 11:53:45


 

साहित्य -

तयार भात दोन वाट्या, आंब्याचा रस पाऊण वाटी, साखर अर्धी वाटी, साजूक तूप ३ चमचे, काजूचे तुकडे, चारोळी, विलायची पूड, मीठ पाव चमचा.

कृती

प्रथम रसात मीठ आणि साखर व्यवस्थित मिसळून घ्यावी. पॅनमध्ये साजूक तूप त्यात काजूचे तुकडे घालून परतावा. नंतर भात घालून परतून घ्यावा. आता आमरस भातात घालून रस आटेपर्यंत परतून घ्यावा. नंतर चारोळी आणि विलायची पूड घालावी. वाटीला तूप लाऊन त्यात भात भरून दाबावा आणि ती वाटी एखाद्या डिशमध्ये पालथी घालावी. त्यावर सजावट करावी..तयार आहे “मँगो स्वीट राईस”

टीप – सध्या आंब्याचा मोसम चालू आहे. पण आमरस खाऊन कंटाळा आला असेल. म्हणून नाविन्यपूर्ण रेसिपी तुमच्यासाठी.

- निशा कोतावार,

बालेवाडी, पुणे.