कोल्ड कॉफी

दिंनाक: 21 May 2019 11:27:09


 

साहित्य –

थंड दुध, कॉफी पावडर, साखर, चॉकलेट सॉस, बर्फाचे तुकडे, व्हॅनिला आईस्क्रीम
कृती –
प्रथम मिक्सरमध्ये थंड दुध घाला. त्यामध्ये कॉफी पावडर आणि चवीनुसार साखर घालुन ते मिक्सरमधून फिरवा. कॉफी घट्ट होण्यासाठी त्यामध्ये व्हॅनिला आईस्क्रीम घाला आणि बर्फाचे तुकडे घाला व छान एकजीव करून घ्या. एका काचेच्या ग्लासला आतून चॉकलेट सॉसने सजावट करा आणि वरील मिश्रण त्यामध्ये ओता. सजावटीसाठी वरून थोडी कॉफी भुरभुरवा. छान दिसतेय ना ! मग ही थंड थंड कोल्ड कॉफी सगळ्यांना सर्व्ह करा !
आत्ता उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही तुमच्या घरच्यांना, मित्र-मैत्रिणींना ही तुमच्या हातची कोल्ड कॉफी प्यायला द्या आणि त्यांना कशी वाटली हे ‘शिक्षणविवेक’ला जरूर कळवा !