पेपर बाऊल

दिंनाक: 18 May 2019 17:29:05


साहित्य:

१) कागद (रंगीत/ वापरलेला)

२) फेविकॉल

३) पेन/ पेनाची रिफील / बांबूची काडी (गोलाकार लांबट वस्तू)

४) अक्रेलिक रंग (वापरलेले कागद घेतल्यास)

कृती:

१) कागदाचे लांबट तुकडे करा. एखाद्या गोलाकार काडीच्या मदतीने कागदाच्या सुरळ्या करा. सुरळ्यांवर थोडासा दाब देऊन त्या थोड्या चापट्या करून घ्या. ४ इंचाचा बाऊल बनवण्यासाठी साधारणता ३०-३५ सुरळ्या लागतात.

२) एकास एक सुरळी चिकटवून त्यास एका बाजूने गोलसर आकारामध्ये दुमडत जा.

३) हवा तेवढा गोल आकार झाल्या वर, आतील भागातून मडक्याप्रमाणे हळूहळू बाऊलचा आकार येईपर्यंत दाब देत राहा. फेविकॉल व पाण्याचे मिश्रण करून बाऊलच्या सर्व बाजूने लावा, ज्यामुळे ते कडक होईल.

४) तयार झालेल्या बाऊलला हवा तो रंग लावा. रंगीत कागद असल्यास, फेविकॉल लावल्यानंतर चिकटपणा जाण्यासाठी पारदर्शी स्प्रे पेंट मारा. या बाऊलपासून विविध वस्तू ही बनवता येतात.

- संपदा कुलकर्णी