साहित्य –

बाजारात विकत मिळणारी गव्हाची बास्केट, मोड आलेले हिरवे मुग, मोड आलेली मटकी, चाट मसाला, लिंबू, मीठ, बारीक शेव, इ.

कृती –

प्रथम एका पातेल्यात मोड आलेले मुग आणि मटकी एकत्र करा. त्यामध्ये चवीनुसार लिंबू, मीठ, चाट मसाला घाला. हे सर्व मिश्रण एकत्र करा. बाजारात मिळणाऱ्या गव्हाच्या बास्केटमध्ये मिश्रण दोन चमचे भरा. सजावटीसाठी वरून शेव घाला. कशी दिसतेय कडधान्याची पौष्टिक बास्केट...! ह्या बास्केटमध्ये तुम्ही तुमचे आवडीचे पदार्थही घालू शकता. घरच्या घरी कमी पदार्थ वापरून तयार होणारी पौष्टिक बास्केट तुम्ही नक्की करून बघा...!