राम-रावण

दिंनाक: 14 May 2019 11:47:54

 
खेळ प्रकार : मैदानी खेळ
वयोगट : ७ ते १४ वर्षे
कितीजण खेळ शकतात : कमीत कमी १० मुले किंवा जास्तीत जास्त कितीही.
रचना : मैदानावर मध्यभागी एक रेघ आखणे त्या रेषेपासून सारख्याच अंतरावर दोन्ही बाजूंस दोन रेघा आखणे व दोन गट पाडून मुलांना ओळीत उभे करणे.
साहित्य : रेघा आखण्यासाठी फक्की
खेळ कसा खेळायचा :
मैदानाच्या मध्यभागी रेषा आखावी. तेथे रेषेच्या दोन बाजूंस दोन गट उभे करावे. एक गट ‘राम’ व दुसरा ‘रावण’ बनेल. खेळ घेणार्‍यांनी रा रा रा रा असे म्हणत कधी राम तर कधी रावण म्हणायचे. रा रा रा रा राम म्हटले की रावण गट आपल्या बाजूला रेघेच्या पलीकडे पळत जाईल व राम गटातील मुले त्यांना पकडण्याचा प्रयत्न करतील. रा रा रावण म्हटल्यास राम गट त्यांना पकडायला जाईल. रेघेच्या आत असताना पकडले तर गडी बाद. अशा तर्‍हेने हळूहळू मुलांची संख्या कमी होईल व ज्या गटातील मुलगा शेवटी राहील तो गट जिंकला.
या खेळातून मुलांना काय मिळते?
1) भरपूर पळापळी होते. त्यामुळे व्यायाम होतो.
2) खेळ घेणार्‍या दादाकडे तो काय म्हणले याकडे लक्ष देऊन एखादी गोष्ट ऐकणे व ताबडतोब त्यावर कृती करणे त्यामुळे मुलांमधील तत्क्षणी निर्णय घेण्याची क्षमता वाढते.
3) दंगा करत खेळता येणारा खेळ असल्यामुळे मुलं खूप मजेत खेळतात.