नमस्कार मित्र हो, आतापर्यंतच्या लेखांमध्ये आपण अवकाश स्पर्धेविषयी खूप गोष्टी पहिल्या. ज्यामध्ये अमेरिका आणि रशिया याचं निर्विवाद वर्चस्व राहिलं. पण येत्या दोन लेखांमध्ये आपण आपला देश आणि अतिशय खडतर परिस्थिती असूनसुद्धा त्यावर मात करून भारताने अवकाश स्पर्धेवर मिळवलेलं वर्चस्व याबद्दल जाणून घेणार आहोत. मला खात्री आहे की हे दोन भाग वाचल्यावर तुम्हालासुद्धा भारताचा प्रचंड अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही.
१९४७ साली भारत स्वतंत्र झाला आणि १९६०च्या दशकात हळूहळू एक विकसनशील राष्ट्र म्हणून स्थिरावत होता. याच काळात अमेरिका आणि रशिया अवकाश स्पर्धेत खूप पुढे निघून गेले होते. १९६०च्या दशकात, डॉ. विक्रम साराभाई यांच्या दूरदृष्टीच्या आधारे भारताची स्वतःची अंतराळ संशोधन संस्था असावी आणि तिचा उपयोग आपल्या राष्ट्राच्या विकासासाठी व्हावा या उद्देशाने इंडियन नॅशनल कमिटी फोर स्पेस रिसर्च अथवा  खछउजडझअठ या नावे १९६२ साली एक संस्था सुरू करण्यात आली. आता या संस्थेमध्ये अजून एका अणु वैज्ञानिकाने पुढाकार घेतला, त्याचं नाव डॉ. होमी भाभा. होमी भाभा यांच्या मदतीने या अवकाश संस्थेमार्फत भारताचे पहिले रॉकेट अवकाशात सोडावे, यासाठी जागा निश्चित करण्याचे प्रयत्न सुरू झाले. या रॉकेटसाठी जागा शोधताना शेवटी तिरुवनंतपुरम जवळील थुंबा हे लहानसे गाव निवडण्यात आले. हे गाव विषुववृत्तापासून जवळ असल्याने रॉकेट प्रक्षेपणासाठी अगदी योग्य असे होते. या थुंबाची कहाणी फार गंमतशीर आहे.
थुंबा गावामध्ये जाण्यात नीट रस्ते नव्हते अथवा काही विशेष सुविधा नव्हत्या. या संस्थेच्या कामकाजासाठी एक जागा हवी होती. या थुंबा गावातच एक चर्च होते. तेथील लोकांचा या चर्चचा वापर कामकाजासाठी करण्यास विरोध होता. परंतु हा विरोध डावलून आणि तेथील सर्व नागरिकांना नीट समजावून हे चर्च या संस्थेच्या हवाली करण्यात आले. त्यानंतर हळूहळू तेथील सर्व नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले. अशा प्रकारे थुंबा येथून भारताच्या अवकाश प्रकल्पाची सुरुवात झाली.
त्यानंतर लगेचच सर्व वैज्ञानिक आणि इतर असे इथे दाखल झाले आणि त्यांनी भारताच्या पहिल्यावहिल्या रॉकेटच्या प्रक्षेपणाची तयारी सुरू केली. या गावात नीट रस्ता नसल्याने आणि कोणतीही इतर दळणवळणाची सोय नसल्याने कधी चालत तर कधी बैलगाडीच्या माध्यमातून या रॉकेटचे तुकडे हे थुंबा येथे आणले जात असत. अशा प्रकारे नीट तयारी झाल्यावर २१ नोव्हेंबर १९६३ साली संध्याकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी भारताचे पहिलेवहिले रॉकेट नाईक अपाचे हे अंतराळात झेपावले आणि त्याने भारताच्या अवकाश झेपेची मुहूर्तमेढ रोवली. आजसुद्धा दर बुधवारी या घटनेची आठवण म्हणून इथे छोटे रॉकेट अवकाशात प्रक्षेपित केले जाते. तसेच ज्या चर्चमधून ही सुरुवात झाली आता तिथे सुंदर असे अवकाश संग्रहालय बनवण्यात आले आहे. तुम्हाला जमेल तेव्हा या संग्रहालयास नक्की भेट द्या.
पहिले रॉकेट प्रक्षेपित केल्यानंतर भारत या अवकाश स्पर्धेत आपले स्थान बळकट करण्यासाठी अधिकाधिक मेहेनत घेऊ लागला. याच दरम्यान १९६९ साली खछउजडझअठ असे संस्थेचे नाव बदलून ते इस्रो म्हणजेच इंडिअन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन असे करण्यात आले. हळूहळू ही प्रगती करत भारताने त्याच्या पहिल्यावहिल्या उपग्रहाची निर्मिती सुरू केली. परंतु हा उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी भारताकडे त्या प्रतीची क्षेपणास्त्रे नसल्याने भारताने रशियाची मदत घेऊन १९ एप्रिल १९७५ साली आपला पहिला उपग्रह यशस्वीरीतीने अवकाशात पाठवला. या उपग्रहाला आद्य भारतीय गणिती आणि खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट याचे नाव देण्यात आले. अशा प्रकारे भारताच्या अवकाश यशात अजून एक तुरा रोवला गेला.
त्यानंतर १९८० सालापर्यंत भारताने स्वतःचे अत्याधुनिक क्षेपणास्त्र बनवले होते, ज्याला डङत म्हणजेच सॅटेलाईट लाँच वेहिकल असे नाव देण्यात आले. याच रॉकेटच्या माध्यमातून भारताने स्वतःच्या मातीमधून १९८० मध्ये रोहिणी नावाचा उपग्रह यशस्वी रीतीने अवकाशात पाठवला. त्यानंतर भारताने पुन्हा कधीच मागे वळून पाहिले नाही आणि पुढे झडङत म्हणजेच पोलर लाँच वेहिकल आणि नंतर ॠडङत म्हणजेच जिओसीनक्रोनास लाँच वेहिकल ही अत्याधुनिक रॉकेट बनवली आणि भारत पुढील अवकाश मोहिमांसाठी सुसज्ज झाला. चला तर मग पुढील लेखामध्ये पाहूयात की भारताने अशी काय किमया केली की आज नासासारखी अंतराळसंस्था सुद्धा भारताला अंतराळ क्षेत्रातील प्रगत देश मानते!
- अक्षय भिडे