• साहित्य :

१० * २० चे आयताकृती २ कार्डशीट, तेलकट खडू, स्केचपेन, कात्री, डिंक/फेविकॉल.

 

  • कृती :

आयताकृती कार्डशीट घ्या. ज्या पद्धतीने आपण जपानी पंखा बनवतो, त्या पद्धतीने दोन्ही कार्डशीटच्या घड्या घाला. त्यावर तेलकट खडूने सर्वात खाली गडद रंगाने आणि वरवर जातजात फिक्या रंगाने शेडिंग करा. नंतर दोन्ही कागद एकमेकांवर चिकटवा. एका कागदावर मोराचे चित्र काढून, चित्रात दाखवल्याप्रमाणे रंगवा. त्यावर छोटे-छोटे लंबवर्तुळ काढून, त्यांना स्केचपेनने बॉर्डर करा. आता तुमचा प्रिटी पिकॉक तयार.

- शैलेश संजय सोळंके