कैरीचा छुंदा

दिंनाक: 11 May 2019 11:43:55


 

कैरीचा छुंदा

साहित्य : दोन मध्यम आकाराच्या कैऱ्या, दीड वाटी साखर, चवीनुसार मीठ, लाल तिखट, २ चमचे जिरेपूड किंवा १ चमचा लवंग व दालचिनीची मिळून पूड, अर्धा चमचा हिंग.

 

कृती : कैऱ्या खिसून घ्या. एक भांड्यात कैरीचा खीस, साखर, हिंग, तिखट, मीठ एकत्र करा. जिरेपूड किंवा लवंग-दालचिनी पूड घाला. त्यावर पातळ फडकं बांधून ३-४ दिवस उन्हात ठेवा. साखर विरघळण्यासाठी अधूनमधून हलवत राहा. चार दिवसात घट्टसर व चकचकीत छुंदा तयार होतो. कैरीचा आंबटगोड छुंदा तुमच्या सुट्टीलाही छान चव देईल. नक्की करुन पाहा.