हे करून पहा...

दिंनाक: 11 May 2019 16:04:19


 

  • भेटा झाडाला / भेट झाडाची

डोळ्यावर पट्टी बांधलेल्या शिबिरार्थींच्या छोट्या गटाला कमी अंतराच्या फेरफटक्याला घेऊन चला. आपण ज्याचा सर्वाधिक उपयोग करतो ते इंद्रिय वा ती संवेदना म्हणजे दृष्टी, तीच त्यांच्याकडून तात्पुरती काढून घेऊन, कमी वापर करत असणाऱ्या इतर इंद्रियांवर वा संवेदनांवर त्यांना लक्ष केंद्रित करू द्या. या सर्वांना सूर्यप्रकाश, सावली, मोकळी जागा, झाडे, हिरवळ, खडकाळ वा दगडी भाग अशा विविध संवेदना अनुभवायला द्या. हे सर्व सावकाश, धीम्या गतीने करा आणि एक नेता म्हणून त्यांचा तुमच्यावरील विश्वास वाढू द्या. त्यानंतर गटातल्या प्रत्येक व्यक्तीला एका वेगवेगळ्या झाडाजवळ थांबवा. स्पर्श करून, वास घेऊन, ऐकून आणि चक्क चव घेऊनही या विशिष्ट झाडाविषयी जेवढी जास्तीत जास्त माहिती मिळवता येईल, ते पाहायला सांगा. त्यानंतर प्रत्येक शिबिरार्थीला झाडापासून दूर त्या, डोळ्यावरची पट्टी काढा आणि प्रत्येकाला त्याचे / तिचे झाड शोधायला सांगा. त्यांना ते मिळाले का ?

  • गंध हाईक

या हाईकवर जाताना तुमच्या गंध संवेदनेद्वारे अवतीभवतीच्या निसर्गावर लक्ष केंद्रित करा. झाडाच्या सावलीचा गंध वा वास कसा येतो ? (पॅडिरोझा पाईन या झाडाला व्हॅनिलासारखा वा बटरस्कॉचसारखा गंध येतो, असे म्हणतात.) सेज झाडाचा गंध कसा येतो ? फुलांचा, गवताचा गंध कसा असतो ? वेगवेगळ्या गोष्टींचा, वस्तूंचा गंध निरनिराळा का असतो ? त्या कीटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतात का ?

  • ढगांकडे बघा

आपण हल्ली ज्याच्याकडे दुर्लक्ष करतो त्या साध्या वा सोप्या आनंदांना विसरू नका. हिरवळीवर पडून आकाशातल्या ढगांकडे – आकाशाकडे बघितलं तर त्यामुळे कल्पनाशक्तीला आणि मेंदूला चालना मिळते आणि नुसतं पडून राहण्यासाठी वेळही मिळतो. ढगांची शर्यत – प्रत्येक व्यक्ती / जण एक विशिष्ट ढग निवडेल आणि निश्चित केलेल्या दूरवरच्या ठिकाणी ज्याचा ढग पहिला पोहोचेल, तो ठरेल विजेता !