झाडांना स्वच्छता लागते. घरगुती बी पेरू नये. लिंबाचे कलमच लावावे. एक वर्षात ४०/५० फळे मिळतात.

निर्माल्य खत = २० इंच लांब - ४ इंच रुंद = इंच खोल खड्डे, त्यात ३-३ फुटाचे पार्टिशन व जाळी लावणे. (उंदीर, घुशी बंद.)

 

काय कराल? महत्त्वाचे -

झाडांजवळील मुंग्या, झुरळांसाठी हिरव्या मिरच्या वाटून त्याचे पाणी घाला. पण फुलाफळांना सौम्य घाला. साधारण भाज्यांचे आयुष्यमान ३ ते ६ महिने असते. फळझाडे दीर्घायुषी, ५ ते ६ फुटांपर्यंत त्यांची उंची वाढते. भाज्यांसाठी २३ सें.मी. मातीच्या थराची जरुरी.

 नारळ झाडावर वाळवी आल्यास २ भाग गोमूत्र + १ भाग पाणी फवारा. इतर झाडांना १ भाग गोमूत्र + २ भाग पाणी घालावे. झाडांना ४/५ तास ऊन हवे, तर भाज्यांसाठी २५ सें.मी. उंचीचा मातीचा थर असावा. रस्त्याच्या कडेला वड, चिंच, आंबा, जांभूळ लावावेत. सुबाभूळ लकवर वाढतात, पण लवकर पडतातही. सोयाबीनतुळे जमीनीची धूप कमी होते. रस्त्याच्याकडेला सूर्यफुले लावल्याने धुळीचे प्रदूषण कमी होते. हवा शुद्ध होते. नी दलदलीच्या ठिकाणीही लावावीत. हळद+तुळस यांचा अर्क + पाणी यामुळे डासांच्या अळ्या कमी होतात. तुम्ही गव्हाकुंर लावा. झाडांची माती मात्र घट्ट नको. बीट, पालक, झेंडू, हळद, पांगारा फुले ही रंगासाठी उपयुक्त आहेत. ऊसाला जास्त पाणी नको. बुरशीला कडुलिंब अर्क फवारा. तंबाखूचे पाणीही चालेल. नंतर ४/५  दिवस तरी भाजी / फळे तोडू नयेत. पाणी निचरा न झाल्याने माती घट्ट होते. बी मातीच्या गोळ्यात घट्ट गुंडाळा. वनीकरणासाठी दूर फेका. झाडे, समुद्र, ढग स्वतः त्रास घेऊन फुले-फळे देतात. माझ्याप्रमाणे झाडांशी प्रेमाने बोला. अबोलीला कडुलिंब पाणी घाला. जर्बेरा पावसाळी व हिवाळी झाडे- पण फुले येत नसली तर माती बदला / नवीन झाडच लावा. फळझाडांचे कलमच लावावे. कडुलिंबाला क्षारीय / दलदलीची जमीन नको. पुरंदर, बुलढाण्यात सेंद्रिय शेती केली जाते. त्यावरील भाजीपाल्याचा सध्या खप जास्त होतो.

झाडांमध्ये काही अभाव निर्माण झाला तर काय कराल ?

 • पाने जळल्यासारखी पिवळी, खुरटलेली वनस्पती दिसते म्हणजे तिला नत्र (नायट्रोजन) कमी आहे, म्हणून मेथीची पाने, देठे घाला.
 • पानांचा आकार बारीक, देठ वेडीवाकडी, जांभळे पट्टे उमटतात तेव्हा त्याला स्फुरद (फॉस्फरस) कमी आहे म्हणून राख, कोबी, नवलकोल, फ्लॉवर यांचा कचरा घाला.
 • पानांची टोके व कडा करपलेल्या गंजासारखी, फुले, फळे पडतात – पलाश (पोटॅश) कमी होत आहे म्हणून त्याला केळीची, पपईची साले तुकडे करुन घाला.
 • पाने हिरवी राहत नाहीत, वाढ खुंटते अशा वेळी गंधक कमी झाले म्हणून कोबी, नवलकोल यांचे लहान तुकडे करुन घाला.
 • पाने शिराभाग पिवळा पडतो, फुले येत नाहीत. कोंब, कळ्या गळतात. शेंडा पिवळा-पांढरा पडतो. पानही गळते. दोडक्याचा कचरा घाला.
 • पाने डागाळलेली. नवीन पाने वाळतात. त्यांना तांबे कमी – कारल्याचा कचरा घाला.
 • कोवळ्या पानाच्या कडा वाकड्या होतात. नवीन कोंब जळतो. देठाचा भाग कमकुवत होतो – कॅल्शियम कमी ; चुना, राख घाला.
 • कोवळ्या पानांची वाढ खुंटली, नवीन पालवीचा हिरवेपणा नाहीसा झाला तर त्याला लोह देण्यासाठी मुळा, कोथिंबीर, वाल, कारली यांचा कचरा घाला.
 • सर्वांना थोडी थोडी शेवगा पाने घाला.

घरातील झाडे

१) अग्लोनिमा २) डासिना ३) ब्रासिया ४) डायफाम ५) अॅरेबिया – विविध अॅडेनियम – शोभेचे झाड

सुका कचरा

प्लॅस्टिक (बाटल्या), थर्माकोल, टूथपेस्ट, पॅकिंगचे सामान, बिस्कीट-वेफर्सची वेष्टणे, दुध पिशव्या, करवंट्या, स्पंज.

ओला कचरा

भाज्या, फळांचा कचरा, चहाचोथा, खरकटे, हगीज, सॅनिटरी नॅपकिन्स.

काय करावे

 • गुलाबाला चहाचा चोथा घाला. फुले चांगली येतात. १५/२० दिवसांनी दोन मुठी सेंद्रिय खत घाला व शेणमिश्रीत पाणी घाला. नोव्हेंबरपासून पाणी दिल्याने ४० दिवसात छान, पुष्कळ फुले येतात.
 • उन्हाळ्यात झाडांना दोन वेळा पाणी घाला. कुंडीत गारव्यासाठी पाचोळा पसरावा.
 • मोगऱ्याला जूनमध्ये पाणी देऊ नये. त्याला फुले येत नसतील तर पाणी कमी घाला आणि आठवड्याला एक मुठ सेंद्रिय खत घाला.
 • कढिलिंबाला ताकमिश्रित पाणी घाला, चांगला वाढतो. वासही चांगला.
 • ऑक्टोबरमध्ये व फेब्रुवारीत नवीन झाडे लावू नयेत.
 • तुळशीची पाने चांगली होण्यासाठी माती बदलावी. पाने लहान / कीड लागत असेल तर तंबाखूचे थोडे पाणी घाला.
 • माती निर्जंतुक करायला फॉंर्मेलिन ५० ग्रम + पाणी १ लिटर मिसळून ते मातीत घाला, मग टी सुकवा.
 • रोजचे तांदूळ, डाळीचे धुवणही झाडांना घाला.
 • चार झाडांनंतर सदाफुलीचे / झेंडूचे एक झाड लावा. त्याच्या वासाने कीड येत नाही. रताळ्याला अधूनमधून मुठभर राख घाला.
 • पाने खाणाऱ्या किडीला राख + १० थेंब रॉकेल टाकावे. झाडाला कीड लागली तर हळद / हिंग / तंबाखूचे पाणी घाला. हिंग + ताक + १० पट पाणी ते फवारा. मुंग्यांसाठी कडू पेंड / वेखंड पावडर, करंजे, हळद घाला.

- मीनल पटवर्धन