शूर, देखणा, युगपुरुष शिवाजीराजांसम,

जन्म तयाचा झाला किल्ले पुरंदर

बाळकडू मुत्सद्दीचे मिळाले घरातूनच,

झलक त्याची दाखवी आग्य्राहून सुटून.

संस्कृत काव्य अन् ग्रंथ बालपणीच लिहून,

बुद्धीची चमक आली तिथेच दिसून.

6 वर्षे सतत झुंजार लढून,

रामशेज किल्ला ठेवला त्याने टिकवून.

रामासम सेतू जंजिर्‍यास बांधिला,

शंभूने सिद्दीस जेरीस आणला.

दूरदृष्टीने मोठा आरमार उभा केला,

तरंगती तोफखाना पहिला त्यानेच बनविला.

पोर्तुगीजांस केले तहास मजबूर,

जनतेस केले गोव्याच्या मुक्त जाचातून.

घरभेदीने साधले औरंगजेबाशी संधान,

अतोनात हाल संभाजीचे केले पकडून.

धर्म बदलण्यास होता, कडाडून विरोध,

केले राजाने चार-हात मृत्युबरोबर.

म्हणूनी ‘धर्मवीर’ तो शंभुराजा झाला,

जनतेने एकमुखाने किताब बहाल केला.

वाघनख्यांनी देहाचे तुकडे झाले दोन,

पण मुखाने सतत महादेवास नमन.

त्या बलिदानाने भूमी धन्य आणि पावन,

आजही येतो अभिमानाने मराठी उर भरून.

अशा छत्रपती संभाजीराजांस आमचा मानाचा मुजरा,

त्रिवार वंदन तुम्हा, आमचा स्वाभिमान जागविला.

 - मंजुषा कुलकर्णी

(पालक)

  एन.ई.एम. स्कूल