माणुसकीची जाण

दिंनाक: 04 Apr 2019 14:02:52


 

माणसा रे माणसा माणसासारखा वाग

माणसा रे माणसा माणसासारखा वाग

कुठे हरवलं तुझं माणूसपण आज IIधृII

माणसाला माणुसकीची जाण नाही

भेटला जरी कोणी, बोलायला वेळच नाही

माणसा रे माणसा माणसासारखा वाग

कुठे हरवलं तुझं माणूसपण आज IIधृII

पैशाच्या मागे धावतात सारी

धर्माच्या नावावर भांडतात भारी

माणसा रे माणसा माणसासारखा वाग

कुठे हरवलं तुझं माणूसपण आज IIधृII

माणूस म्हणून माणसाला जगता येत नाही

मेला जरी कोणी, बघायलाही वेळ नाही

माणसा रे माणसा माणसासारखा वाग

कुठे हरवलं तुझं माणूसपण आज IIधृII

ग्लोबलायझेशनच्या दुनियेत जगतात सारी

विज्ञान आहे या दुनियेवर भारी

माणसा रे माणसा माणसासारखा वाग

कुठे हरवलं तुझं माणूसपण आज IIधृII

झाडांची तोड केलीत खरी

प्रदूषणाने आपल्यावर केली स्वारी

माणसा रे माणसा माणसासारखा वाग

कुठे हरवलं तुझं माणूसपण आज IIधृII

- रामकृष्ण रमेश जठार