सुट्टी

दिंनाक: 10 Apr 2019 09:25:13


 

कंटाळवाणी बोअरिंग सॉलेड

एक्झाम एकदा संपली

म्हटलं आता धमाल करू

सुट्टी सुरू आपली।

आईस्क्रीम, गार्डन, गेम्स आणि

भरपूर सार्‍या मूव्ही

दिवसभर फक्त बघणार

आपण आता टी.व्ही.

मनात सारं ठरवून म्हटलं ... यार चंगळ आहे आपली।

कार्टून नेटवर्क, क्रिकेट आणि

खूप खूप चॉकलेट

मस्त लोळायचं बेडवर

डेली उठायचं लेट।

मॅथ्स, सायन्स, होमवर्क, प्रोजेक्ट, कटकट सारी मिटली।

सिफेर वरच्या वाळूत

पिकनीक करायची नक्की

येतायेता घरी वाटेत

भेळ खायची पक्की

स्कूलबॅग टाकली कोपर्‍यात आणि बॅट क्रिकेटची शोधली।

खेळलो फिरलो दंगामस्ती

रग्गड होती केली

म्हणता म्हणता डोन्टनो

सुट्टी कधी संपली

मॅथ्स, सायन्स, प्रोजेक्ट, होमवर्क आता लाईन सगळी लागली

कंटाळवाणी सॉलेड बोअरींग शाळा सुरू झाली

खरं सांगू या शाळेत पण आहे थोडी गंमत

तिच्याच मुळे कळते खरी सुट्टीची किंमत!

लट्स ओके एक्झाम थोडी बोअरिंग असते,

वर्षभर सारखी सारखी टेन्शन सुद्धा देते

पण शेवटी एकदा ती कंटाळवाणी सॉलेड बोअरिंग एक्झाम एकदा संपते

आणि मग.........

- अक्षय वाटवे