पान गळती सुरू झाली

अन् पाखरे उडून गेली

ती जाणारच असे गृहीत धरायचे

नुकतेच पंख फुटलेले... मोकळे आकाश

ती तरी काय करणार बिचारी???

झाड झाले विराण एकटे

पण एक हळवे मन जागे होते

ते नेहमीच म्हणायचे... स्वतःशी

पुन्हा सुगी येईल बहर येईल

आणि कसे हिरवेगार होऊ

पुन्हा पाखरे येतील... गाणी गातील

काट्याकुट्या जमा करून घरटे बांधतील

पापणी ओळी करत वाट पाहायची

झाडात तेव्हा मला आई दिसायची...

- रवींद्र गोळे