सोअर

दिंनाक: 07 Mar 2019 15:51:53


 

Soar चा अर्थ उंच झेपावणे. आता इथे या शब्दाला थोडासा वेगळा दृष्टिकोनही आहे.

काय वेगळा दृष्टिकोन आहे? तर इथे उंच झेपावणे म्हणजे कर्तृत्वाने उंच झेपावणे.

शॉर्टफिल्मविषयी अधिक जाणून घेऊयात. ही गोष्ट आहे एका ध्येयवेड्या मुलीची. या मुलीला विमान बनवण्याच्या ध्येयाने झपाटले आहे. ती एक विमान बनवतेय, तिचे खूप प्रयत्न सुरू आहेत, पण तिच्या प्रयत्नांना म्हणावं तसं यश येत नाहीये. तिचं विमान उडतंय. पण काही अंतरावर जाऊन कोसळतंय. इतक्यात परग्रहावरून कोणीतरी येतं आणि या मुलीला तिच्या ध्येयाप्रती रस्ता दाखवत. परग्रहावरून आलेली ही मुलगी रस्ता चुकलीय आणि तिचं विमानही नेमकं खराब झालं आहे. आता या परग्रहावरच्या मुलीचं विमान दुरुस्त करण्याच्या नादात दुसऱ्या मुलीला यशस्वी विमान कसं बनवायचं हे समजतं. या गोष्टीत अजून एक खूप महत्त्वाचं मूल्य शिकण्यासारखं आहे. दुसऱ्याला मदत करताना पूर्ण इमानदारीने आणि प्रामाणिकपणे करावी. चांगली कृती कधीच वाया जात नाही. या गोष्टीत कथेतल्या मुख्य मुलीला विमान बनवयाचा मार्ग सापडतो तर परग्रहावरच्या मुलीला तिच्या लोकांकडे जाण्याचा रस्ता.

ही शॉर्टफिल्म बघण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा. नक्की पाहा.

https://youtu.be/UUlaseGrkLc

- भाग्यश्री भोसेकर-बीडकर