व्यक्ती विशेष

दिंनाक: 30 Mar 2019 11:41:49


वसंत आबाजी डहाके (३० मार्च १९४२) हे मराठीचे भाषातज्‍ज्ञ, कोशकार तसेच लेखक आणि कवी आहेत. १९६६ साली 'योगभ्रष्ट' या दीर्घ कवितेमुळे ते प्रकाशात आले. शुभवर्तमान (१९८७), योगभ्रष्ट (१९७२), शुनःशेप, अधोलोक (१९७५ कादंबरी), प्रतिबद्ध आणि मर्त्य (लघु-कादंबरी),  संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश (१९९७) इ. साहित्य प्रसिध्द आहे. पूर्वसुरींचा व्यासंग आणि आधुनिक मराठी वाङ्मयाचे प्रगल्भ आकलन आणि पृथगात्म चिंतनशील भाष्य हे त्यांच्या लेखनाचे गुणवैशिष्ट्य आहे.