जग पुढे गेलं

दिंनाक: 25 Mar 2019 16:08:56


वाघाची डरकाळी ऐकावीशी वाटते,

पण सिमेंटच्या जंगलात वादळ उठते!

कोकिळेला साद घालावीशी वाटते,

पण लोकलच्या शिट्टीने इच्छाच मिटते!

कोंबड्यांची बांग ऐकेन, मी थाटात,

पण पप्पांची पोल्ट्री मुंबईच्या पोटात!

हुतुतू, खो-खो, लपंडाव घ्यावी वाटे संधी,

पण सारेच झालेत क्रिकेटचे छंदी!

जग पुढे गेले, तू राहू नको मागे.

पण निसर्गाच्या स्वप्नांचे कसे तोडू धागे?

- शंभम पडवळ

५वी ‘क’, छत्रपती शिक्षण मंडळ