द वॉल

दिंनाक: 24 Mar 2019 12:49:30

 


प्रत्येक व्यक्तीत काही ना काही गुण असतात.
या शॉर्टफिल्ममधल्या मुलाकडे बरेच गुण आहेत. हा मुलगा शरीराने अपंग आहे, त्याचा एक पाय अधू आहे आणि त्याच्या डोळ्यांना चष्म्याशिवाय नीट दिसत नाही. असं असूनही या मुलाकडे प्रचंड कलात्मक गुण आहेत. कागदाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बनवणे, चित्रं काढणे, रंगवणे याप्रकारचे छंद या मुलाला आहेत. याची झलक पूर्ण घरभर आणि त्याच्या खोलीत सतत जाणवत राहते.

हा मुलगा त्याच्या वडिलांसोबत एका घरात राहतो आहे. त्या घराला एक सुंदर फाटक आहे. पण इथे बाहेर एक प्रशस्त भिंत आहे. रोज काय होतं की पहाटे कोणीतरी जाहिरातवाले, वेगवेगळ्या पक्षाचे लोक या घराबाहेरच्या भिंतीवर आपल्या जाहिराती लावून जातात.

या भिंतीवर सूचना लिहिलेली असूनही लोक इथे जाहिराती लावतात, म्हणून त्या मुलाचे बाबा रोज वैतागतात. रोजचा हा दिनक्रम आहे, आणि हा मुलगा यावर उपाय शोधतो. काय उपाय शोधतो? ते तुम्ही प्रत्यक्षच पहा.

खालील लिंकवर क्लीक करून तुम्ही ही शॉर्टफिल्म पाहू शकता.

https://youtu.be/QqCZcMAC5Hk

- भाग्यश्री भोसेकर-बीडकर