भोपळ्याने एकदा निश्चय केला

लठ्ठपणाचा कंटाळा आला

उठाबशा काढल्या रोज

पहाटे फिरू लागला

वर्षभर श्रावण उपास केला

मनावर घेतले सर्वांचेच बोलणे

शक्य होईल ना शिडशिडीत होणे

सुरू सर्वांचे कुजबूज करणे

टाळ्या देऊन पैज लावणे

चमत्कार झाला वर्षा – दीड वर्षाने

सत्कार केला सर्वांनी आनंदाने

सुरू झाले गावभर फिरणे

महत्त्व लुकडेपणाचे समजावणे

व्यायामाचे बोलणे सर्वांना समजले

भोपळ्याने सर्वांसोबत योगासन केले.

-  संकेत हारकर

रेणावीकर विद्या मंदिर