रोज करतो नमस्कार

अगदी वाकून वाकून तुला

चुकूनसुद्धा देत नाहीस सुट्टी

एक दिवस शाळेला

 

किती मी सांगतो याला

मोठ्ठा मोठ्ठा पाऊस पाड

ग्राउंड, बाग सोडून साऱ्या

शाळा तेवढ्या बंद पाड

 

किती माझे हात दुखतात

एवढं होमवर्क लिहीताना

उमटू दे की आपोआप

नुसती वही उघडताना

 

किती छान दिसतं

फुलपाखरू भिरभिरताना

एकदा तरी पंख दे

मज्जा येईल उडताना

 

एकदाच असा कोन बनव

आईसक्रीम मस्त खाताना

संपणारच नाही तो

छान छान छान म्हणताना

 

किती सांगावे लागते तुला

नक्की तू ऐकतोस ना रे?

मग जरा मान हलवून

‘हो’ तरी म्हण की रे!

 

-  संकेत देवकाते

  इ. ७वी

  मुलांचे विद्यालय, पुणे