रंग कशाचा...

दिंनाक: 21 Mar 2019 17:24:40

रंग हा जादूचा, चमकणार्‍या होळीचा
रंग हा निसर्गाचा उडणार्‍या पक्षांचा
 
रंग कशाचा...
रंग हा मजेचा एकमेकांना लावण्याचा
सण हा आनंदाचा एकत्र येण्याचा
 
सण हा रंगाचा सर्वांनी जाणून घेण्याचा
सण रंगाचा आनंदाचे महत्त्व जाणण्याचा
 
रंग हा जीवनाचा हसत खेळत राहण्याचा
रंग हा आनंदाचा मनामनाला आवडण्याचा
 
क्षण हा आनंदाचा सर्वांमध्ये रंगण्याचा
रंग हा देशाचा जीवनात पुन्हा येण्याचा
 
  - श्रेया कांबळे, इ. ६वी
  नाना पालकर प्राथमिक विद्यालय