होळीचा सण

दिंनाक: 20 Mar 2019 17:38:13


होळीचा सण आला जवळ

लहान मुलांची सुरू झाली धावपळ

होळी आली होळी आली

आई कर ना गं पुरणाची पोळी

छान रंग करू तयार

पाणी उडवू गारेगार

पानांचा हिरवा बीटाचा लाल

करू तयार रंग येईल धमाल

हळदीचा पिवळा आणि सुरेख केशरी

रंगून जाऊ, मजा येईल भारी

अशी करू या होळी साजरी!

-    आर्या जोशी