आमची शाळा

दिंनाक: 19 Mar 2019 18:13:43


 
शाळा हे नाव किती खास
विद्या देते ती आम्हास
 
शाळेचे नाव ऐकताच मन फुलून येते
जसे बागेत रंगीबेरंगी फूल डोलते
 
शाळा ही विद्या देते
नंतर आपल्याला यश मिळते
शाळा नाही शिकली तर...
नंतर डोळ्यात अश्रू येते
 
शाळेत आपल्याला गुरू मिळतो
गुरू आपल्याला ज्ञान देतो 
 
शाळा हे नाव किती खास 
पहिले मिळतात थोडे त्रास
नंतर मिळते फळ आम्हास.
 
- उमेश ब्रम्हानंद कदम
  म.ए.सो. मुलांचे विद्यालय, 
  ८वी - जी