वीर वामनराव जोशी (वामन गोपाळ जोशी) (जन्म : अमरावती, १८ मार्च १८८१; मृत्यू : अमरावती, ३ जून १९५६) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक असून मराठी नाटककार, कवी आणि पत्रकार होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी ‘राष्ट्रमत’ ह्या वृत्तपत्रात देशभक्त गंगाधरराव देशपांडे ह्यांचे प्रमुख सहकारी म्हणून काम केले. लोकजागृतीसाठी त्यांनी एक साप्ताहिक चालवले होते. त्यांची वाणी आणि लेखणी ओजस्वी होती. वीररसप्रधानता हे वामनरावांच्या नाटकाचे वैशिष्ट्य. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे प्रासादीक पदरचना. 'रणदुंदुभी'नंतर ‘धर्मसिंहासन’, ‘शीलसंन्यास’ आणि ‘झोटिंग पातशाही’ अशी तीन नाटकेही त्यांनी लिहिली. मा. वामनराव जोशी यांचे ३ जून १९५६ रोजी निधन झाले.