फुले झाली मुले

दिंनाक: 18 Mar 2019 17:47:50


एकदा काय झाले

फुले गेली शाळेत, मुले गेली बागेत

मुलांच्या जागी गेली फुले

फुलांच्या जागी आली मुले

 

शाळेत जाताना फुलांची झाली घाई

भुंग्याला मुलांचा वासच येत नाही

 

फुलांना वाटले आपण काय करतोय

मुलांना वाटले इकडे छान डोलतोय

 

मुलांच्या डोक्यावर उगवले तुरे

फुलांनी बघितले चमचम तारे

 

मुले नेसली हिरवा शालू

फुले लागली वाळूत खेळू

 

मुलांच्या डोक्यावर दवबिंदू पडे

फुलांनी म्हटले तीसचे पाढे

 

बिचारी मुले बागेत सुकली

फुले बिचारी बेरजा चुकली

 

फुलांनी केली मुलांची संगत

वर्गात झाली फुलांचीच गंमत

 

फुलांनी केली शाळेत मस्ती

मुलांनी केली झाडांशी दोस्ती

 

अखेर मुलांनी ठरवले जावे शाळेत

फुलांनाच त्यांनी पाठवले बागेत

 

-    सृष्टी नवाथे

इयत्ता ९वी, गंगा,

अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स 

(मूळ संकल्पना शांताबाई शेळके यांची फुले झाली मुले ही कविता.)