फुलपाखरू

दिंनाक: 17 Mar 2019 17:35:38

रंगीबेरंगी फुलपाखरे उडती इकडे-तिकडे 
गुलाबी, हिरवा, नीळा, जांभळा जणू रंगांचे ते सडे
 
इवले इवले रंगीबेरंगी पंख त्यांचे पाहून 
क्षणातच गेले मन मोहून
 
ह्या फुलावरून त्या फुलावर फुलपाखरू भिरभिरे
फळांमधील मध चाखून क्षणातच ते उडे
 
मखमलीच्या गालीच्यासारखे रंग त्याचे वेगवेगळे
सगे-सोयरे कितीतरी, जग त्याचे आगळे
 
मलाही आवडेल त्याच्यासारखे फुलपाखरू व्हायला 
त्याच्यासारखे फिरायला अन त्याचे रंग ल्यायला
 
- मृणाली मिलिंद इनामदार
इयत्ता ९वी, नर्मदा
अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स